पंतप्रधानांनी सामाईक केली अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाची झलक

January 04th, 04:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाची झलक समाज माध्यमावर सामायिक केली आहे. मोदी म्हणाले की या प्रदर्शनाबद्दल मला एक विशेष जिव्हाळा आहे, कारण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी या प्रदर्शनाची प्रगती जवळून पाहिली आहे. अशी प्रदर्शने निसर्गाच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करतात आणि निसर्गाच्या शाश्वततेबद्दल जागरूकता निर्माण करतात, असेही ते म्हणाले.