आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
October 10th, 06:25 pm
140 कोटी देशवासीयांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.याच ठिकाणी,याच स्टेडीयममध्ये 1951 मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या हा सुखद योगायोग आहे. आज आपणा सर्वांनी जी कामगिरी केली आहे,जे यश साध्य केले आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात उत्सवी वातावरण आहे. पदकांचा 100 चा टप्पा ओलांडण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत केलीत.आशियाई क्रीडा स्पर्धेत आपणा सर्व खेळाडूंच्या कामगिरीने अवघ्या देशामध्ये अभिमानाची भावना दाटून आली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांनी केले संबोधित
October 10th, 06:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके जिंकली ज्यामुळे खंडीय बहु-क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या एकूण पदकांच्या संख्येच्या दृष्टीने ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 26th, 04:11 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.काशी सांसद सांस्कृतिक महोत्सव 2023चा समारोप आणि वाराणसीमधील अटल निवासी विद्यालयांच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 23rd, 08:22 pm
विश्वनाथ बाबांच्या आशीर्वादाने काशीचा सन्मान, गौरव नित्य नवीन उंचीवर जात आहे. जी-20 शिखर परिषदेच्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगामध्ये अपना ध्वज रोवला आहे. परंतू त्यामध्ये झालेली काशीची चर्चा विशेष म्हणावी लागेल. काशीची सेवा, काशीचा स्वाद, काशीची संस्कृती आणि काशीचे संगीत... जी-20 साठी जे-जे पाहुणे काशीमध्ये आले, ते या आपल्या सर्व आठवणी बरोबर घेऊन गेले आहेत. मला असे वाटते की, जी-20 ला मिळालेले हे अद्भुत यश महादेवांच्या आशीर्वादानेच शक्य झाले आहे.पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या सांगता सोहळ्याला केले संबोधित
September 23rd, 04:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथील रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्रात काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या सांगता सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे 1115 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 16 अटल निवासी विद्यालयांचे उद्घाटन केले. मोदी यांनी काशी संसद खेल प्रतियोगितेच्या नोंदणीसाठी पोर्टलचे देखील उदघाटन केले. काशी संसद सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसेही देण्यात आली. कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी अटल निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 23rd, 02:11 pm
आज पुन्हा वाराणसीला येण्याची संधी मिळाली. वाराणसीमध्ये येऊन झालेला आनंद शब्दात मांडणे अशक्य आहे. पुन्हा एकदा म्हणा...ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! आज मी अशा दिवशी काशीमध्ये आलो आहे जेव्हा चंद्राच्या ‘शिवशक्ती’ या स्थानावर भारत पोहोचलेल्याला एक महिना पूर्ण होत आहे. ‘शिवशक्ती’ म्हणजे गेल्या महिन्याच्या 23 तारखेला आपले चांद्रयान जिथे उतरले ते स्थान आहे. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आहे. तर शिवशक्तीचे दुसरे स्थान माझ्या या काशीत आहे. आज शिवशक्तीच्या या स्थानावरून, शिवशक्तीच्या त्या स्थानावरील भारताच्या विजयासाठी मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी
September 23rd, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. वाराणसीतील गंजरी, रजतलाब येथे सुमारे 450 कोटी रुपये खर्चून हे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम विकसित केले जाईल आणि त्याचे क्षेत्रफळ 30 एकरपेक्षा जास्त असेल.पंतप्रधान 23 सप्टेंबरला वाराणसीला भेट देणार
September 21st, 10:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. वाराणसी येथे दुपारी 1.30 च्या सुमाराला पंतप्रधान आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची कोनशिला बसवतील. दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधान रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्र येथे दाखल होतील आणि काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023च्या सांगता समारंभात सहभागी होतील. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या 16 अटल निवासी शाळांचे ते उद्घाटन करतील. वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम म्हणजे क्रीडा क्षेत्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. वाराणसीमध्ये गंजरी, राजतलब येथे 30 एकर जागेत सुमारे 450 कोटी रुपये खर्चाने हा आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारला जाणार आहे.