पंतप्रधानांचे संसदेच्या विशेष अधिवेशनात केलेले भाषण
September 18th, 11:52 am
देशाच्या संसदेचा 75 वर्षांचा प्रवास, त्याचे पुन्हा एकदा स्मरण करण्यासाठी आणि नव्या सदनात जाण्यापूर्वी इतिहासातील त्या प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करत अग्रेसर होण्याची ही वेळ आहे. आपण सर्वजण या ऐतिहासिक भवनातून निरोप घेत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे सदन इंपिरियल लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे ठिकाण होते. स्वातंत्र्यानंतर या वास्तूला संसद भवन म्हणून नवीन ओळख मिळाली. हे खरे आहे की, या इमारतीच्या निर्मितीचा निर्णय विदेशी संसदेने घेतला होता, मात्र या भवनाच्या निर्मितीत माझ्याच देशवासियांनी घाम गाळला होता, परिश्रम केले होते आणि धन देखील माझ्याच देशाचे होते.पंतप्रधानांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाला लोकसभेत केले संबोधित
September 18th, 11:10 am
सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, नव्याने उदघाटन झालेल्या इमारतीत कामकाज हलवण्यापूर्वी भारताच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे पुनःस्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या संसद भवनाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी नमूद केले की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ही इमारत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल म्हणून काम करत होती आणि स्वातंत्र्यानंतर भारताची संसद म्हणून ओळखली गेली. ही इमारत बांधण्याचा निर्णय जरी परकीय राज्यकर्त्यांनी घेतला असला, तरी भारतीयांची मेहनत, समर्पण आणि पैसा यामुळेच या वास्तूचा विकास झाला याकडे त्यांनी लक्ष वेधले.संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
September 18th, 10:15 am
चांद्र मोहिमेचे यश, चंद्रयान-3 आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवे प्रेरणा केंद्र बनले आहे, तिरंगा पॉईंट आपला अभिमान वाढवत आहे. जगभरात जेव्हा अशी कामगिरी केली जाते तेव्हा त्याला आधुनिकता, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडून त्याकडे पाहिले जाते. आणि जेव्हा हे सामर्थ्य जगासमोर येते, तेव्हा भारतासाठी अनेक शक्यता, अनेक संधी आपल्या दारात येऊन उभ्या राहतात. जी -20 चे अभूतपूर्व यश, जगभरातील नेत्यांचे 60 हून अधिक ठिकाणी स्वागत, विचारमंथन आणि संघराज्य रचनेचा खऱ्या अर्थाने जिवंत अनुभव भारताची विविधता, भारताची वैशिष्ट्ये, जी -20 आपल्या विविधतेचा उत्सव बनला. आणि आपण जी -20 मध्ये ग्लोबल साउथचा आवाज बनल्याचा भारताला नेहमीच अभिमान असेल. आफ्रिकन संघाला मिळालेले स्थायी सदस्यत्व आणि जी -20 मध्ये एकमताने जारी झालेले घोषणापत्र या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देत आहेत.यशोभुमी राष्ट्राला समर्पित करताना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठीत अनुवादीत मजकूर
September 17th, 06:08 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे या भव्य वास्तुत आलेले माझे प्रिय बंधू-भगिनी, देशातील 70 होऊन जास्त शहरांतील माझे सर्व सहकारी, अन्य मान्यवर आणि माझ्या कुटुंबियांनो.पंतप्रधानांनी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे नवी दिल्लीमध्ये केले लोकार्पण
September 17th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यशोभूमीमध्ये एक अतिशय भव्य परिषद केंद्र, विविध प्रदर्शन दालने आणि इतर सुविधांचा अंतर्भाव आहे. पंतप्रधानांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आज पीएम विश्वकर्मा योजनेचा देखील शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यावर पंतप्रधानांनी गुरु शिष्य परंपरा आणि नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनाची फेरफटका मारून पाहणी केली. त्यांनी यशोभूमीच्या त्रिमितीय प्रतिकृतीची देखील पाहणी केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाईनच्या द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 या नव्या मेट्रो स्थानकापर्यंतच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये द्वारका इथल्या ‘यशोभूमी’, या भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार
September 15th, 04:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता द्वारका, नवी दिल्ली येथे 'यशोभूमी' इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी द्वारका सेक्टर 21 आणि यशोभूमी द्वारका सेक्टर 25 येथील नवीन मेट्रो स्थानक यांना जोडणाऱ्या दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गाच्या विस्तारित मार्गीकेचे उद्घाटनही करतील.