आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन
April 04th, 09:46 am
आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023 नक्कीच विशेष आहे.पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 5व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
April 04th, 09:45 am
सारे जग एकमेकांशी जोडलेले असताना आपत्तींचा प्रभाव फक्त स्थानिक राहत नाही त्यामुळे जागतिक दृष्टीकोनातून सीडीआरआयची निर्मिती झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे, आपला प्रतिसाद एकाकी न ठेवता एकीकृत केला पाहिजे,असे ते म्हणाले. अवघ्या काही वर्षांत, प्रगत आणि विकसनशील देशांतील, लहान-मोठे, जगाच्या दक्षिण किंवा उत्तर भागातले 40 हून अधिक देश सीडीआरआयचा भाग बनले आहेत असे त्यांनी नमूद केले. सरकार व्यतिरिक्त, जागतिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि तज्ञ देखील यात सहभागी आहेत हे उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 04th, 12:15 pm
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वात सहभागी होताना मला आनंद होत आहे. सुरुवातीला, आपण स्वतःला हे स्मरण करून द्यायला हवे की, शाश्वत विकास उद्दिष्टांचे वचन कोणालाही मागे न ठेवण्याचे आहे. म्हणूनच आपण अत्यंत गरीब आणि सर्वात असुरक्षित लोकांच्या आकांक्षा पूर्ततेसाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आणि, पायाभूत सुविधा म्हणजे केवळ भांडवली संपत्ती निर्माण करणे आणि गुंतवणुकीवर दीर्घकालीन परतावा निर्माण करणे असे नाही. ही आकडेवारी नाही.पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसंदर्भातील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला केले संबोधित
May 04th, 10:29 am
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट महामहिम मॉरिसन एमपी, घानाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम नाना अड्डो डंकवा अकुफो-अड्डो, जपानचे पंतप्रधान महामहिम फ्युमियो किशिदा, आणि मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष महामहिम एंड्री निरिना राजोएलिना यांनीही या सत्राला संबोधित केले.आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा सहकार्याच्या (CDRI) वार्षिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
March 17th, 02:36 pm
PM Modi addressed the opening ceremony of International Conference on Disaster Resilient Infrastructure. PM Modi called for fostering a global ecosystem that supports innovation in all parts of the world, and its transfer to places that are most in need.पंतप्रधानांनी आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले
March 17th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून CDRI अर्थात आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. फिजी, इटली आणि युनायटेड किंगडम या देशांचे पंतप्रधान या प्रसंगी उपस्थित होते. अनेक देशांच्या केंद्र सरकारांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि खासगी क्षेत्रातील अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील या परिषदेत भाग घेतला.