पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नायजेरियाच्या राष्ट्र्पतींसोबत औपचारिक चर्चा

November 17th, 06:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 17 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान नायजेरियाच्या भेटीवर आहेत. आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्र्पती महामहिम बोला अहमद तिनुबू यांची अबुजा इथे भेट घेऊन, त्यांच्यासोबत औपचारिक चर्चा केली. नायजेरिया दौऱ्यासाठी स्टेट हाऊस इथे पोहोचताच पंतप्रधानांचे 21 बंदुकाच्या फैऱ्यांनी सलामी देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले.

जागतिक सिंह दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

August 10th, 09:03 am

पंतप्रधान मोदींनी सर्व वन्यजीव प्रेमींना गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचे आणि सिंहाच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे साक्षीदार होण्याचे तसेच गुजरातच्या लोकांचे आदरातिथ्य अनुभवण्याचेही निमंत्रणही दिले.

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

February 29th, 04:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली असून या आघाडीचे मुख्यालय भारतात असेल. वर्ष 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी एकवेळची अर्थसंकल्पीय तरतूद म्हणून दीडशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

केनियाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले निवेदन

December 05th, 01:33 pm

राष्ट्रपती रूटो आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन

October 09th, 12:00 pm

टांझानियाच्या राष्ट्र प्रमुख म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मात्र त्या भारत आणि भारतातील लोकांबरोबर दीर्घकाळापासून जोडल्या गेलेल्या आहेत.

15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

August 23rd, 03:30 pm

पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे भव्य आयोजन आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपति रामाफोसा यांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.

जग हवामान बदलाच्या समस्येच्या विळख्यात असताना आम्ही जगाला मार्ग दाखवला आणि मिशन लाईफ हा पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उपक्रम सुरू केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

August 15th, 05:08 pm

77व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आम्ही जी-20 शिखर परिषदेसाठी ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना मांडली आणि या दिशेने काम करत आहोत. जग हवामान बदलाच्या समस्येच्या विळख्यात असताना आम्ही जगाला मार्ग दाखवला आहे आणि मिशन लाईफ हा पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उपक्रम सुरू केला आहे.

जागतिक पर्यावरण दिन 2023 निमित्त पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

June 05th, 03:00 pm

जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना, देशभरातील आणि जगभरातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याचे अभियान ही आहे. आणि मला आनंद आहे की आज जग ज्याबाबत बोलत आहे त्यावर भारत गेली 4-5 वर्षे सातत्याने काम करत आहे. 2018 मध्येच, भारताने एकदा वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकपासून मुक्त होण्यासाठी दोन स्तरांवर काम करण्यास सुरुवात केली होती. एकीकडे आम्ही एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे आणि दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे, भारतात सुमारे 30 लाख टन प्लास्टिक पॅकेजिंगचा पुनर्वापर करणे अनिवार्य झाले आहे. भारतात दरवर्षी निर्माण होणाऱ्या एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या 75 टक्के हे प्रमाण आहे. आणि आज सुमारे 10 हजार उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालक त्याच्या कक्षेत आले आहेत.

पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित बैठकीला व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित

June 05th, 02:29 pm

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.