पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये केलेले भाषण
December 11th, 04:40 pm
कोणीही व्यक्ती त्याचे कार्य, त्यांच्या कविता, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे जीवनकार्य पाहून आश्चर्यचकित होईल. ज्या वाराणसी शहराचे संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मला मिळाला आहे, त्या वाराणसी शहराबरोबरही त्यांचा खूप जवळचा संबंध होता. सुब्रमण्यम भारती यांनी केलेल्या कार्याची माहिती संकलित केलेले 16 खंड प्रकाशित झाले आहेत, ते अलिकडेच माझ्या पाहण्यात आले. अवघे 39 वर्ष – इतक्या अल्पायुष्यामध्ये त्यांनी विपुल लेखनकार्य केले त्याचबरोबर खूप प्रचंड कार्यही त्यांनी केले. त्यांचे लेखनकार्य आपल्याला वैभवशाली भविष्याकडे वाटचाल करताना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे.आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये पंतप्रधानांचे भाषण
December 11th, 04:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण केले आणि भारतीयार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. महाकवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त वानावील सांस्कृतिक केंद्रातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वर्षीचा भारती पुरस्कार मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी अभ्यासक सिनी विश्वनाथ यांचे अभिनंदन केले.