प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी
April 30th, 11:32 am
आजच्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी ह्यांनी म्हटलं की लाल दिव्यामुळे देशात व्हीआयपी पद्धत सुरू झाली आणि वाढली. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आपण न्यू इंडिया बद्दल बोलतो तेव्हा व्हीआयपी पेक्षा इपीआय जास्त महत्वाचे आहे, इपीआय म्हणजे 'एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट' . पंतप्रधानांनी सुट्ट्यांचा छान वापर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि नवनवीन जागी भेट द्यायला सांगितलं. ते उन्हाळ्याबद्दल भीम अँप बद्दल आणि भारताच्या समृद्ध विविधतेबद्दल देखील खूप विस्ताराने बोलले.भारताने सुशासन, अहिंसा आणि सत्त्याग्रहाचा संदेश दिला आहे: पंतप्रधान
April 29th, 01:13 pm
बसव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांत पंतप्रधान म्हणाले की भारताचा इतिहास केवळ पराजय, दारिद्र्य आणि वसाहतवादाचा नसून भारताने नेहमी सुशासन, अहिंसा आणि सत्त्याग्रहाचा संदेश दिला आहे. तीन तलाकच्या प्रथेमुळे मुस्लीम समुदायाच्या महिलांची होणारी कुचंबणा संपविण्यासाठी मुस्लीम समुदायातूनच एखादा सुधारक पुढे येईल असं विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ह्या मुद्द्याकडे राजकीय चष्म्यातून न बघण्याचे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधानांच्या हस्ते बसव आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
April 29th, 01:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात बसव जयंती 2017 आणि बसव जयंती सुवर्ण महोत्सव समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण केले. वेळोवेळी सामाजिक बदल आणि सुधारणा घडविण्याच्या कार्यात नेतृत्व करणाऱ्या संत महंतांच्या समृद्ध परंपरेविषयी पंतप्रधान बोलले.