
पंतप्रधानांनी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधीमंडळाशी साधला संवाद
April 17th, 08:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाशी संवाद साधला.
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
April 08th, 01:30 pm
लाभार्थी : सर मी आज माझी यशोगाथा सांगू इच्छितो.पाळीव प्राण्याबद्दलच्या माझ्या छंदातून मी उद्योजक कसा झालो हे सांगू इच्छितो. माझ्या व्यवसाय उपक्रमाचे नाव आहे K9 वर्ल्ड.यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे पाळीव प्राणी आणि त्यांना लागणारी औषधे पुरवतो सर. मुद्रा योजनेतून कर्ज मिळाल्यानंतर आम्ही अनेक सुविधा सुरु केल्या, सर.पाळीव प्राण्यांच्या निवाऱ्यासाठीची सुविधा आम्ही सुरु केली, ज्यांनी हे पाळीव प्राणी आपल्या घरात ठेवले आहेत त्यांना बाहेर जायचे असेल तर ते आमच्याकडे त्या प्राण्यांना ठेवून जाऊ शकतात आणि आमच्या इथे त्या प्राण्यांना तिथल्या घराप्रमाणेच वातावरण मिळते. प्राण्यांप्रती मला आगळी माया आहे,सर,मी स्वतः जेवलो किंवा नाही त्याने मला फरक पडत नाही पण मी या प्राण्यांना खाऊ घालतो सर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
April 08th, 01:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग इथल्या आपल्या निवासस्थानी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले, पाहुण्यांचे स्वागत करण्याचे सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, तसेच या सर्वांच्या उपस्थितीमुळे घरात येणाऱ्या पावित्र्यावरही त्यांनी आवर्जून भर दिला. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सहभागींना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांनी पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे आणि सेवांचा व्यवसाय सुरुवे केलेल्या एका उद्योजक लाभार्थ्याशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या सर्व लाभार्थ्यांना ज्यांनी त्यांच्या कठीण काळात त्यांच्या क्षमतांवर विश्वास दाखवला त्या सर्वांचे आभार मानण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. त्यांनी या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी कर्ज मंजूर केलेल्या बँक अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचे आणि त्यांनी मंजुर केलेल्या कर्जामुळे साधता आलेली प्रगती त्यांना दाखवण्याचा सल्ला दिला. आपल्या अशा कृतींमुळे या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती त्यांना मिळेलच, आणि सोबतच मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तींना पाठबळ देण्याच्या त्यांच्या निर्णयावरही त्यांचा स्वतःचा विश्वास निर्माण होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळाचे परिणाम त्यांना दाखवले तर त्यामुळे त्यांनाही तुमच्या प्रगती आणि यशात दिलेल्या योगदानाचा नक्कीच अभिमान वाटेल असे पंतप्रधान म्हणाले.1996 च्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या विशेष संवादाचा मजकूर
April 05th, 10:25 pm
मला बरं वाटतय की मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आणि मला वाटते की तुमचा संघ असा आहे की आजही भारतातील लोक तो लक्षात ठेवतात….कशी गोलंदाजांची धुलाई करुन तुम्ही आला होता, ते लोक विसरलेले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत साधला संवाद
April 05th, 10:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेत कोलंबो इथे श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत संवाद साधला. हा एक मनमोकळा अनौपचारिक संवाद होता. या संवादादरम्यान, क्रिकेटपटूंनी पंतप्रधानांना भेटून आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पंतप्रधानही या संघाला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. या संघाची प्रभावी कामगिरी भारतीय नागरिकांच्या अद्यापही स्मरणात असल्याचे, विशेषत: कायमस्वरूपी छाप सोडलेला त्यांचा अविस्मरणीय विजय त्यांना अजूनही आठवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संघाची कामगिरी आजही देशात गाजत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.
March 17th, 08:52 pm
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे एनसीसी छात्र आणि एनएसएस स्वयंसेवक यांच्याशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
January 25th, 03:30 pm
सर, आज तुम्हाला पाहून माझे स्वप्न पूर्ण झालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत साधला संवाद
January 25th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.पंतप्रधानांनी एनसीसी छात्र, एनएसएस स्वयंसेवक, आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी साधला संवाद
January 24th, 08:08 pm
आगामी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी संवाद साधला. त्यानंतर देशाची समृद्ध संस्कृती आणि विविधता दर्शविणारे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, 12 जानेवारी रोजी ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होणार
January 10th, 09:21 pm
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिना निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भारत मंडपम, नवी दिल्ली येथे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होतील. यावेळी ते देशभरातील 3,000 युवा नेत्यांशी संवाद साधतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्याची 25 वर्षांची परंपरा खंडित करणे, हे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगचे उद्दिष्ट आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख युवकांना राजकारणात आणून विकसित भारताची त्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेला अनुसरून हा उपक्रम आहे. या अनुषंगाने, यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, पंतप्रधान देशाच्या भावी नेत्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी आखलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतील. यावेळी हे नवोन्मेशी युवा नेते पंतप्रधानांच्या समोर भारताच्या विकासाकरता महत्वाच्या असलेल्या दहा क्षेत्रांवर आधारित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करतील. या सादरीकरणांमध्ये युवा नेत्यांनी भारतापुढील काही सर्वात गंभीर आव्हानांची हाताळणी करण्यासाठी सुचवलेल्या नवोन्मेशी कल्पना आणि उपायांचे प्रतिबिंब उमटेल.साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकादरम्यान नमो भारत रेल्वे गाडीतील प्रवासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि ट्रेन लोको पायलटशी साधलेला संवाद
January 05th, 08:50 pm
मनात आपल्या आपल्या बाळगून एक लक्ष्य, ध्येय आपुले घेऊनी प्रत्यक्षपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो भारत रेल्वे मधील संवाद केला सामायिक
January 05th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबााबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे द्वारे प्रवास केला. आपल्या या प्रवासादरम्यान त्यांनी युवा मित्रांशी प्रेमळ संवाद साधला, ज्यांनी पंतप्रधानांना अनेक चित्रे आणि कलाकृती भेट दिल्या.स्वाभिमान अपार्टमेंट्सच्या लाभार्थ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
January 03rd, 08:30 pm
होय, सर, मला मिळाले आहे. आम्ही तुमचे अपार ऋणी आहोत. आम्हाला झोपडीतून बाहेर काढून तुम्ही महाल दिलात. एवढ्या भव्य गोष्टीची आम्ही कधी कल्पनाही केलेली नाही, पण तुम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणले... होय, सर.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमान अपार्टमेंटच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
January 03rd, 08:24 pm
'सर्वांसाठी घरे' या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमधील अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झुग्गी झोपडी (जेजे) क्लस्टरमधील रहिवाशांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांना भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमान अपार्टमेंटच्या लाभार्थ्यांशी संवादही साधला. स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये राहायला आलेल्या लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या गृहनिर्माण उपक्रमाने घडवलेल्या परिवर्तनाबद्दल समाधान व्यक्त केले. आतापर्यंत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि आता कायमस्वरूपी घरे मिळालेल्या कुटुंबांच्या जीवनातील सकारात्मक बदल या संवादामधून प्रतिबिंबित झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 45 व्या ‘प्रगती’ (PRAGATI) संवादाचे आयोजन
December 26th, 07:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ (PRAGATI) च्या 45 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रगती’ (PRAGATI) हे कार्य-तत्पर प्रशासन आणि कार्यक्रमांची वेळेवर अंमलबजावणी यासाठीचे केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेले आयसीटी-आधारित मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंशी साधला संवाद
November 22nd, 05:31 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंशी संवाद साधला आणि क्रिकेटने भारत आणि गयाना यांच्यात जवळीक प्रस्थापित करून, उभय देशातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ केले आहेत, असे नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी साधला संवाद
October 04th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ओदिशा मधील भुवनेश्वर इथे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
September 17th, 04:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या भुवनेश्वरमधे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमधल्या चॅम्पियन्सशी साधलेला संवाद
September 13th, 03:25 pm
आज मला आपणाकडून ऐकायचे आहे.आपणा सर्वांचे काय अनुभव होते,तिथे सर्वाना भेटले असाल,काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील हे सर्व मला ऐकायचे आहे.PM Modi interacts with Paris Paralympic champions
September 13th, 03:25 pm
PM Modi warmly interacted with the Indian contingent from the Paris Paralympics 2024, celebrating their achievements and encouraging them. He praised medalists like Ajeet Singh Yadav and Sumit Antil, shared heartfelt moments with athletes like Navdeep Singh, Palak Kohli and Sharad Kumar, and playfully engaged with the team, emphasizing his support and enthusiasm for their inspiring performances and future successes.