हझिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेलं भाषण

November 08th, 10:51 am

एखादा प्रकल्प सुरु झाल्यामुळे कशा प्रकारे व्यवसाय सुलभता देखील वाढते आणि त्याचबरोबर जगणे देखील किती सुलभ होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता मला ज्या चार-पाच बंधू -भगिनींशी बोलण्याची संधी मिळाली आणि ते ज्याप्रकारे आपले अनुभव सांगत होते, मग ती तीर्थयात्रेची कल्‍पना असेल, वाहनांचे कमीत कमी नुकसान होण्याची चर्चा असेल, वेळेची बचत होण्याबाबत चर्चा असेल, शेतात जे उत्पादन होते त्याचे नुकसान टाळण्याचा विषय असेल, ताजी फळे, भाजीपाला सुरत सारख्या बाजारापर्यंत पोहचवणे असेल, इतक्या छान पद्धतीने सर्वांनी सांगितले, एक प्रकारे याचे जितके आयाम आहेत ते सर्व त्यांनी आपल्यासमोर सादर केले. आणि त्यामुळे व्यापारातील सुविधा वाढतील, वेग वाढेल, मला वाटते कि खूप आनंदाचे वातावरण आहे. व्यापारी, व्यावसायिक असेल, कर्मचारी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, प्रत्येकाला या उत्तम वाहतूक व्यवस्थेचा लाभ होणार आहे. जेव्हा आपल्या माणसांमधील अंतर कमी होते तेव्हा मला देखील खूप समाधान मिळते.

पंतप्रधानांनी हजिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलचे केले उद्घाटन

November 08th, 10:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन केले आणि गुजरातमधील हजिरा आणि घोघा दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी स्थानिक वापरकर्त्यांशी देखील संवाद साधला. त्यांनी नौवहन मंत्रालयाचे नाव बदलून बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय असे नामकरण केले.

पंतप्रधान 8 नोव्हेंबरला हजिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन करणार आणि हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविणार

November 06th, 03:41 pm

जलमार्ग वाहतुकीसाठी हजिरा येथे तयार करण्यात आलेल्या रो-पॅक्स टर्मिनलची लांबी 100 मीटर असून रूंदी 40 मीटर आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. टर्मिनलमध्ये प्रशासकीय कार्यालयाची इमारत, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, विद्युत उपकेंद्र आणि पाण्याची टाकी अशा आवश्यक असलेल्या सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ

October 22nd, 05:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथे एका जनसभेत वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित केली.

पंतप्रधान गुजरातला भेट देणार, घोघा आणि दहेज दरम्यान रोरो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २२ ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत.

October 21st, 06:17 pm

घोघा येथे एका सभेत पंतप्रधान घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करतील.