गुजरातमधील दाहोद येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 20th, 09:49 pm

गुजरातचे लोकप्रिय मुख्‍यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी , या देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्‍णव जी, मंत्रिमंडळातील सहकारी दर्शना बेन जरदोश, संसदेतील माझे वरिष्‍ठ सहकारी , गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्‍यक्ष सी. आर. पाटील, गुजरात सरकारचे मंत्रीगण, खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय आदिवासी बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील दाहोद आणि पंचमहाल येथे 22000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली

April 20th, 04:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाहोद येथील आदिजाती महासंमेलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी 1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. नर्मदा नदीच्या खोऱ्यावर बांधण्यात आलेल्या सुमारे 840 कोटी रुपयांच्या दाहोद जिल्हा दक्षिण क्षेत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे त्यांनी उद्‌घाटन केले. यातून दाहोद जिल्ह्यातल्या सुमारे 280 गावांच्या आणि देवगड बारिया शहरातील पाणी पुरवठ्याच्या गरजा पूर्ण केल्या जातील. सुमारे 335 कोटी रुपयांच्या दाहोद स्मार्ट सिटीच्या पाच प्रकल्पांचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले. या प्रकल्पांमध्ये एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्र (ICCC) इमारत , स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था , सीवरेज कामे, घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, पंचमहाल आणि दाहोद जिल्ह्यातील 10,000 आदिवासींना 120 कोटी रुपयांचे लाभ देण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी 66 केव्ही घोडिया उपकेंद्र, पंचायत घरे, अंगणवाड्यांचे देखील उद्‌घाटन केले.

पंतप्रधान 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला देणार भेट

April 16th, 02:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.