AAP-da's sinking ship will drown in Yamuna Ji: PM Modi in Kartar Nagar, Delhi
January 29th, 01:16 pm
PM Modi today, addressed a massive crowd in Kartar Nagar, declared that Delhi had rejected excuses, fake promises, and deception. He asserted that the city demanded a double-engine BJP government focused on welfare and development, ensuring housing, modernization, piped water, and an end to the tanker mafia. Confident of victory, he proclaimed, On February 5th, AAP-da Jayegi, BJP Aayegi!”PM Modi’s power-packed rally in Kartar Nagar ignites BJP’s campaign
January 29th, 01:15 pm
PM Modi today, addressed a massive crowd in Kartar Nagar, declared that Delhi had rejected excuses, fake promises, and deception. He asserted that the city demanded a double-engine BJP government focused on welfare and development, ensuring housing, modernization, piped water, and an end to the tanker mafia. Confident of victory, he proclaimed, On February 5th, AAP-da Jayegi, BJP Aayegi!”जगातील पाणथळ जागांसाठी मान्यताप्राप्त 31 शहरांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर आणि उदयपूरचे केले अभिनंदन
January 25th, 05:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील पाणथळ जागांसाठी मान्यताप्राप्त 31 शहरांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल इंदूर आणि उदयपूरचे अभिनंदन केले. ही मान्यता शाश्वत विकास, निसर्ग आणि शहरी विकास यांच्यातील सुसंवाद जोपासण्यासाठी भारताची दृढ वचनबद्धता दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले.भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 309 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला दिली मंजुरी
September 02nd, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण 18,036 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल आणि प्रवासाची गतिशीलता सुधारेल तसेच या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेला वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्राप्त होईल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून आखण्यात आला आहे, जो या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” बनवेल आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास करेल ज्यामुळे या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.इंदूर येथे 'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
December 25th, 12:30 pm
आजचा हा कार्यक्रम आपल्या श्रमिक बंधू-भगिनींची अनेक वर्षांची तपस्या , त्यांची अनेक वर्षांची स्वप्ने आणि संकल्पांचे फलित आहे. आणि मला आनंद आहे की आज अटलजींची जयंती आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचे हे नवे सरकार, नवे मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशातील माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आणि तोही माझ्या गरीब, कष्टकरी बंधू-भगिनींसाठी होणे आणि अशा कार्यक्रमात येण्याची मला संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे.'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
December 25th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित सुमारे 224 कोटी रुपयांचा धनादेश प्राधिकृत अधिकारी आणि हुकुमचंद गिरणी कामगार संघटना, इंदूरच्या प्रमुखांकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हुकुमचंद गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. खरगोन जिल्ह्यात 60 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केलीइंदूर इथं येत्या 25 डिसेंबर रोजी होणार असलेल्या 'मजदुरों का हित मजदुरों को समर्पित' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी. हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित धनादेशही करणार सुपूर्द
December 24th, 07:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदूर इथं येत्या 25 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता होणार असलेल्या 'मजदुरों का हित मजदुरों को समर्पित' या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. यावेळी ते इंदुरमधल्या हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित सुमारे 224 कोटी रुपयांचा धनादेश अधिकृत अवसायक आणि कामगार संघटनेच्या प्रमुखांना सुपूर्द करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान हुकुमचंद गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही पूर्तता केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला देणार भेट
October 04th, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राजस्थान मध्ये जोधपूर येथे पंतप्रधान 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मध्य प्रदेशात जबलपूर येथे पोहोचतील. या ठिकाणी ते 12,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे, रस्ते, गॅस पाईपलाईन, गृहनिर्माण आणि स्वच्छ पेयजल या क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील.मध्यप्रदेश मध्ये ग्वाल्हेर येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 02nd, 09:07 pm
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह जी तोमर, वीरेंद्र कुमार जी, ज्योतिरादित्य सिंधिया जी, इतर सर्व मान्यवर, आणि येथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या कुटुंबियांनो, ग्वाल्हेरच्या या ऐतिहासिक भूमीला माझे शत शत प्रणाम!मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
October 02nd, 03:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-वडोदरा द्रुतगती मार्गाचे समर्पण,पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या 2.2 लाखांहून अधिक घरांचे गृहप्रवेश आणि पंतप्रधान आवास योजना - शहरी अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण, जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी, आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानांतर्गत 9 आरोग्य केंद्रांची पायाभरणी, आयआयटी इंदूरच्या शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण आणि संकुलातील वसतिगृह आणि इतर इमारतींसाठी पायाभरणी आणि इंदूरमध्ये मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे.मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
September 14th, 12:15 pm
बुंदेलखंडची ही धरती वीरांची धरती आहे, शूरवीरांची धरती आहे. या भूमीला बीना आणि बेतवा, दोन्हींचा आशीर्वाद मिळाला आहे. आणि मला तर एक महिन्यात दुसऱ्यांदा, सागरला येऊन आपणा सर्वांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आणि मी शिवराज जींच्या सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण आज इथे येऊन, आपणा सर्वांचे दर्शन घेण्याची संधी दिली. मागच्या वेळी मी संत रोहिदासजींच्या त्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना भेटायला आलो होतो. आज मला मध्य प्रदेशचा विकास आणि त्या विकासाला नवी गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळत आहे. हे प्रकल्प, या क्षेत्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देतील. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता, पन्नास हजार कोटी किती असतात? आपल्या देशातल्या अनेक राज्यांचा पर्ण वर्षाचा अर्थसंकल्प देखील इतका नसतो, जितका खर्च आज एकाच कार्यक्रमासाठी भारत सरकार करत आहे. यातून हे दिसून येते की मध्य प्रदेशसाठी आमचे संकल्प किती मोठे आहेत. हे सगळे प्रकल्प येणाऱ्या काळात मध्य प्रदेश मध्ये लाखो तरुणांना रोजगार देतील. हे प्रकल्प, गरीब आणि मध्यमवर्गातल्या कुटुंबांची स्वप्न सत्यात उतरवणारे आहेत. मी बीना रिफायनरीचे विस्तारीकरण आणि अनेक नव्या सुविधांच्या भूमिपूजनाच्या मध्य प्रदेशच्या कोट्यवधी जनतेला अनेक अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी
September 14th, 11:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात बिना येथे 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बिना रिफायनरीमधील 49,000 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार होणारे पेट्रोकेमिकल संकुल, नर्मदापुरम येथे पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी झोन’, इंदूरमध्ये दोन आयटी पार्क आणि रतलाम येथे मेगा इंडस्ट्रियल पार्क आणि मध्य प्रदेशात सहा नवी औद्योगिक क्षेत्रे यांचा समावेश होता.जी 20 श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
July 21st, 09:06 am
ऐतिहासिक आणि चैतन्यमयी इंदौर शहरात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. हे असे शहर आहे जे आपल्या समृद्ध पाककला परंपरांचा अभिमान बाळगते. मला आशा आहे की तुम्हाला या शहराचे सर्व रंग आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटता येईल.पंतप्रधानांनी जी 20 देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीला केले संबोधित
July 21st, 09:05 am
रोजगार एक महत्वाचा आर्थिक आणि सामाजिक मुद्दा असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की रोजगार क्षेत्रात काही सर्वाधिक महत्वाच्या बदलांच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. या वेगवान घडामोडीं समजावून घेण्यासाठी, प्रतिसादात्मक आणि परिणामकारक धोरणे आखण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केले. सध्याच्या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात तंत्रज्ञान हे रोजगारासाठी महत्वाचे साधन बनले आहे आणि पुढेही तसेच राहिल, असे पंतप्रधान म्हणाले. आधीच्या तंत्रज्ञान-बदलांच्या लाटेत भारताने तंत्रज्ञानाशी संबधित अगणित रोजगार निर्माण केल्याचं त्यांनी अधोरेखित केले आणि यजमान शहर इंदोर हे अशा नवीन परिवर्तनाच्या लाटेत उदयाला आलेल्या अनेक स्टार्टअप्सचे माहेरघर आहे असे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी पाच वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले
June 27th, 10:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानक इथून पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या पाच वंदे भारत गाड्या आहेत - भोपाळ (राणी कमलापती) - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस; भोपाळ (राणी कमलापती) - जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस; रांची - पाटणा वंदे भारत एक्सप्रेस; धारवाड - बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस आणि गोवा (मडगाव) - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस.Today, after 9 years, I am happy to say that our partnership with Nepal has truly been a "HIT": PM Modi
June 01st, 12:00 pm
PM Modi, in his address during the press meet PM Prachanda, acknowledged the significant bilateral ties between India and Nepal. He said that the ‘HIT’ formula would serve as a transformative agenda in the relations between the two countries. Various agreements in the areas of rail connectivity, energy, cross border digital payments among others were signed between the two countries.पंतप्रधानांकडून इंदूर दुर्घटनेतील पीडितांसाठी सानुग्रह मदत जाहीर
March 30th, 07:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून (पीएमएनआरएफ) सानुग्रह मदत जाहीर केली आहे.इंदूरमधील दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
March 30th, 02:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरमधील दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली आहे.मध्य प्रदेशमध्ये इंदूर येथे आयोजित 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनातील पंतप्रधानांचे भाषण
January 09th, 12:00 pm
गयानाचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इरफान अली जी, सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी जी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेलजी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर जी, मंत्रिमंडळातील इतर सहकारी आणि प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या निमित्ताने जगभरातून आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,