Fourth BIMSTEC Summit Declaration, Kathmandu, Nepal (August 30-31, 2018)

August 31st, 12:40 pm



नेपाळमधल्या काठमांडू येथे ‘बिमस्टेक’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 30th, 05:28 pm

‘बिमस्टेक’ सदस्य देशांमधून आलेले माझे सहकारी नेते, सर्वात प्रथम या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या यजमानपदाबद्दल आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी नेपाळ सरकारचे आणि पंतप्रधान ओली जी यांचे अगदी ह़ृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. वास्तविक माझ्यासाठी ही पहिलीच बिमस्टेक शिखर परिषद आहे. परंतु 2016 मध्ये मला गोव्यामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेबरोबर ‘बिमस्टेक रिट्रीट’चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. गोवा इथं आपण कृती कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार आमच्या सर्व समुहांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.

पंतप्रधानांनी नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली

May 28th, 06:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली.

नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन

May 12th, 04:39 pm

शाक्य जी, आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी काठमांडूच्या महानगरपालिकेने माझ्यासाठी या स्‍वागत समारंभाचे आयोजन केले आहे. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. हा केवळ माझाच नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान आहे. एकटा मी नाही तर सव्वाशे कोटी भारतीय याबद्दल कृतज्ञ आहेत. काठमांडूशी आणि नेपाळशी प्रत्येक भारतीयाचे एक आपुलकीचे नाते आहे. आणि हे सौभाग्‍य मलाही लाभले आहे.