मन की बात: 'मेरा पहला वोट - देश के लिए'... प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

February 25th, 11:00 am

नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.

भारत-ओमानच्या संयुक्त सांगीतिक सादरीकारणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

January 30th, 10:17 pm

प्रजासत्ताक दिनानिमित्त ओमानमधील भारतीय दूतावासामध्ये आयोजित दूतावास समारंभात भारत-ओमान संयुक्त संगीत सादरीकरणाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे.

उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

January 09th, 10:37 pm

भारतीय शास्त्रीय संगीत विश्वातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे.

मध्यप्रदेशात चित्रकूट इथे झालेल्या तुळसीपीठ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 27th, 03:55 pm

सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी, इथे आलेली सर्व तपस्वी ज्येष्ठ संत मंडळी, ऋषी मंडळी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री बंधू शिवराजजी, उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सभ्य स्त्री पुरुष हो!

PM addresses programme at Tulsi Peeth in Chitrakoot, Madhya Pradesh

October 27th, 03:53 pm

PM Modi visited Tulsi Peeth in Chitrakoot and performed pooja and darshan at Kanch Mandir. Addressing the gathering, the Prime Minister expressed gratitude for performing puja and darshan of Shri Ram in multiple shrines and being blessed by saints, especially Jagadguru Rambhadracharya. He also mentioned releasing the three books namely ‘Ashtadhyayi Bhashya’, ‘Rambhadracharya Charitam’ and ‘Bhagwan Shri Krishna ki Rashtraleela’ and said that it will further strengthen the knowledge traditions of India. “I consider these books as a form of Jagadguru’s blessings”, he emphasized.

काशी सांसद सांस्कृतिक महोत्सव 2023चा समारोप आणि वाराणसीमधील अटल निवासी विद्यालयांच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 23rd, 08:22 pm

विश्वनाथ बाबांच्या आशीर्वादाने काशीचा सन्मान, गौरव नित्य नवीन उंचीवर जात आहे. जी-20 शिखर परिषदेच्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगामध्ये अपना ध्वज रोवला आहे. परंतू त्यामध्ये झालेली काशीची चर्चा विशेष म्हणावी लागेल. काशीची सेवा, काशीचा स्वाद, काशीची संस्कृती आणि काशीचे संगीत... जी-20 साठी जे-जे पाहुणे काशीमध्ये आले, ते या आपल्या सर्व आठवणी बरोबर घेऊन गेले आहेत. मला असे वाटते की, जी-20 ला मिळालेले हे अद्भुत यश महादेवांच्या आशीर्वादानेच शक्य झाले आहे.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या सांगता सोहळ्याला केले संबोधित

September 23rd, 04:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथील रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्रात काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या सांगता सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे 1115 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 16 अटल निवासी विद्यालयांचे उद्घाटन केले. मोदी यांनी काशी संसद खेल प्रतियोगितेच्या नोंदणीसाठी पोर्टलचे देखील उदघाटन केले. काशी संसद सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसेही देण्यात आली. कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी अटल निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ख्यातनाम गायक मुकेश यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

July 22nd, 07:53 pm

भारतीय सिनेसंगीतावर ख्यातनाम गायक मुकेश यांच्या आजही कायम असलेल्या प्रभावाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले. सुरांच्या अनभिषिक्त सम्राटाची आज 100 वी जयंती आहे.

प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

May 10th, 01:25 pm

प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

April 14th, 08:57 pm

ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार रिकी केज यांना भेटून आनंद झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी देताना पंतप्रधान म्हणाले, “संगीताप्रती आपला उत्साह आणि आवड उत्तरोत्तर अधिक प्रखर होत जावो.”

डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संगीतकार, रिकी केज यांचे केले अभिनंदन

April 04th, 06:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संगीतकार रिकी केज यांचे डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पंडीत जसराज सांस्कृतिक फाऊंडेशनच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 28th, 04:45 pm

या विशेष कार्यक्रमात उपस्थित दुर्गा जसराजजी, शारंगदेव पंडितजी, पंडित जसराज कल्चरल फाऊंडेशनचे सह-संस्थापक नीरज जेटलीजी, देशातील आणि जगातील सर्व संगीतज्ञ आणि मान्यवर कलाकार, बंधू आणि भगिनींनो!

पंडित जसराज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या उद्‌घाटन समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

January 28th, 04:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील आदरणीय व्यक्तिमत्व पंडित जसराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी पंडित जसराज यांच्या संगीतातील अमर उर्जेबद्दल सांगितले आणि त्यांचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवल्याबद्दल दुर्गा जसराज आणि पंडित शारंग देव यांची प्रशंसा केली. पंडित जसराज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या उद्‌घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान बोलत होते.

मध्य आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

December 20th, 04:32 pm

कझाकस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या मध्य आशियाई देशातील परराष्ट्र मंत्र्यांनी 20 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-मध्य आशिया संवादाच्या 3ऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मध्य आशियाई देशांचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत आले आहेत.

लसींच्या 100 कोटी मात्रा दिल्यानंतर भारताची आता नवा उत्साह आणि नव्या ऊर्जेसह पुढे वाटचालः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

October 24th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वाना नमस्कार| कोटी कोटी नमस्कार, आणि मी कोटी कोटी नमस्कार यासाठी म्हणत आहे कारण 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे. आमच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे, सर्वाच्या प्रयत्नांच्या मंत्रशक्तिचं प्रत्यंतर दाखवत आहे.

जन्माष्टमीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले लता मंगेशकर यांचे आभार

August 30th, 09:53 pm

लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. लतादीदींनी पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे ट्विट करत त्यासोबत एक गुजराती भजन जोडले होते.

"परीक्षा पे चर्चा 2021" मध्ये पंतप्रधानांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेला संवाद

April 07th, 07:01 pm

नमस्कार, मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? तुमची परीक्षेची तयारी अगदी जोरात सुरू असेल, अशी अपेक्षा आहे? ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाची ही पहिली व्हर्चुअल आवृत्ती आहे. तुम्हा सर्वांना कल्पना आहेच, आपण सर्व गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या सावटात आयुष्य व्यतीत करत आहोत आणि त्यामुळेच प्रत्येकालाच काही तरी नवनवीन कल्पनांचा वापर करावा लागत आहे, मला देखील तुम्हा सर्वांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मोह यावेळी टाळावा लागत आहे आणि एका नव्या स्वरुपात तुमच्या समोर यावे लागत आहे.

“परीक्षा पे चर्चा 2021” या कार्यक्रमाच्या दूरदृश्य प्रणाली आवृत्तीमध्ये पंतप्रधानांनी साधला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद

April 07th, 07:00 pm

परीक्षा पे चर्चा मध्ये एक्झाम वॉरियर्स, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेचा तणाव, त्याविषयी वाटणारी भीती दूर करण्यासंबंधीचे काही कानमंत्र सांगितले. आपल्यावर येणारे परीक्षेचे दडपण कसे दूर करता येईल, याबद्दल विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्र्नांना पंतप्रधान मोदींनी उत्तरे दिली. त्याचबरोबर आगामी बोर्ड परीक्षांमध्ये चांगले यश मिळवण्याच्यादृष्टीनेही पंतप्रधानांनी काही टिप्स दिल्या.

पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

February 04th, 05:14 pm

पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

प्रख्यात व्हायोलिन वादक टी. एन. कृष्णन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

November 03rd, 01:25 pm

प्रख्यात व्हायोलिन वादक टी.एन. कृष्णन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.