जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

July 21st, 07:45 pm

आज भारत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत आहे. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना ज्ञान आणि आध्यात्माच्या या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. अशा महत्वपूर्ण दिनी आज 46 व्या जगतिक वारसा समितीच्या या बैठकीचा प्रारंभ होत आहे. आणि भारतात प्रथमच याचे आयोजन होत आहे. आणि स्वाभाविक आहे माझ्यासह सर्व देशवासियांना याचा विशेष आनंद आहे.मी याप्रसंगी जगभरातून आलेले सर्व मान्यवर आणि अतिथींचे स्वागत करतो. विशेषतः मी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे ऑज़ुले यांचेही अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, जागतिक स्तरावरील प्रत्येक आयोजनाप्रमाणे हा कार्यक्रम देखील भारतात यशाचे नवे विक्रम स्थापित करेल.

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन

July 21st, 07:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन केले. जागतिक वारसा समितीची दरवर्षी बैठक होते आणि जागतिक वारसा विषयक सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्याबरोबरच जागतिक वारसा यादीत नोंदवल्या जाणाऱ्या स्थळांचा निर्णय घेण्याचे दायित्व या समितीकडे असते.भारत प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करत आहे. यावेळी पंतप्रधानांनी विविध प्रदर्शनांना भेट देऊन आढावा घेतला.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित, इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023, या भारतीय कला, वास्तूकला आणि रचना या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

December 08th, 06:00 pm

प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रतिके-खुणा असतात. या खुणा जगाला त्या देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मूल्यांची ओळख करून देतात. आणि, ही प्रतिके घडवण्याचे काम राष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वास्तू करत असतात. राजधानी दिल्ली अशा अनेक प्रतिकांचे केंद्र आहे, ज्यात आपल्याला भारतीय वास्तुच्या भव्यतेचे दर्शन घडते. त्यामुळे दिल्लीत आयोजित ‘इंडिया आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन बिएनाले’ हा भारतीय कला, वास्तूरचना शास्त्र आणि रचना महोत्सव, अनेक अर्थांनी विशेष आहे. मी इथे उभारलेली, सजवलेली दालने बघत होतो, आणि मी उशीरा आलो त्याबद्दल तुमची माफी देखील मागतो कारण मला यायला उशीर याच कारणामुळे झाला..इथे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आणि व्यवस्थित वेळ देऊन समजून घेण्यासारख्या असल्यामुळे त्यात वेळ जाऊन मला उशीर झाला. तरीही मला 2 ते 3 जागा सोडाव्या लागल्या. या दालनांमध्ये रंग आणि सर्जनशीलता आहे. त्यात संस्कृती आहे, तसेच सामाजिक प्रतिबिंब आहे. मी या यशस्वी आरंभाबद्दल, सांस्कृतिक मंत्रालय, त्याचे सर्व अधिकारी, सर्व सहभागी देश आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्याकडे असे म्हटले जाते की पुस्तक म्हणजे जग पाहण्याची एक लहानशी खिडकी म्हणून सुरुवात आहे. मी असे मानतो की कला हा मानवी मनातून प्रवास करण्याचा राजमार्ग आहे.

दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्‌घाटन

December 08th, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 (आयएएडीबी) अर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत डिझाइन सेंटर’ आणि समुन्नती या विद्यार्थी द्वैवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी स्मृती तिकिटही प्रकाशित केले. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम दिल्लीतील सांस्कृतिक ठिकाणांची ओळख करून देईल.

आमचे इस्रायल बरोबर असलेले संबंध परस्पर विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे : पंतप्रधान मोदी

July 05th, 10:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत लोकांना संबोधित केले. इस्रायलच्या विकासाच्या प्रवासाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इस्राएलने दाखवून दिले आहे की आकारापेक्षा इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे. ज्यू समुदायाने विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानासह भारताला समृद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारचे; त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी आभार मानले.

इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधांनी केलेले भाषण

July 05th, 06:56 pm

PM Narendra Modi addressed a community event in Tel Aviv. Appreciating Israel in its development journey, Prime Minister Modi remarked, “Israel has shown that more than size, it is the spirit that matters. Jewish community has enriched India with their contribution in various fields.” PM Modi also thanked PM Netanyahu and Government of Israel for their warm hospitality.

व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (3 सप्टेंबर 2016)

September 03rd, 05:05 pm

PM Modi held a joint press briefing with Prime Minister of Vietnam, Mr. Nguyen Xuan Phuc. During the press statement, PM Modi mentioned that both the countries have agreed to deepen their defense and security engagement. PM also highlighted that both India and Vietnam have decided to upgrade their strategic partnership to a comprehensive strategic partnership and agreed to tap into growing economic opportunities in the region.