पंतप्रधानांनी गयाना मधील भारतीय आगमन स्मारकाला दिली भेट
November 21st, 10:00 pm
स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहताना, पंतप्रधानांनी गयानामधील भारतीय समुदायाचा संघर्ष आणि बलिदानाचे तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्वाच्या योगदानाचे स्मरण केले. स्मारकाजवळ त्यांनी बेल पत्राचे रोप लावले.हे स्मारक 1838 मध्ये गयाना येथे करारबद्ध भारतीय स्थलांतरितांना घेऊन आलेल्या पहिल्या जहाजाची प्रतिकृती आहे. भारताने 1991 मध्ये गयानाच्या नागरिकांना दिलेली ही भेट आहे.