सिंगापूरच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधानांची भेट

September 05th, 03:00 pm

भारत - सिंगापूर भागीदारीसाठी राष्ट्रपती थर्मन यांच्या समर्थनाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. विश्वास, परस्परांचा आदर आणि पूरकतेवर आधारित दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्याची त्यांनी नोंद घेतली. या संदर्भात, त्यांनी नमूद केले की हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाल्यामुळे संयुक्त सहकार्यासाठी पुढे जाण्याचा एक ठोस मार्ग आखला जाईल. प्रगत उत्पादन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये भारत आणि सिंगापूर कशा प्रकारे सहकार्याचा विस्तार करू शकतात यावर त्यांनी विचार सामायिक केले. पुढील वर्षी राष्ट्रपती थर्मन यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांची सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग यांच्यासोबत बैठक

September 05th, 02:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री आणि माजी पंतप्रधान महामहिम ली सिएन लूंग यांची भेट घेतली. यावेळी मंत्री महोदयांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते.