पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांच्या हस्ते स्टार्ट अप पोर्टलचे उदघाटन
June 24th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांनी आज भारत-पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप हब चे (आयपीआयएसएच) लिस्बन इथे उदघाटन केले.स्टार्ट अप इंडिया द्वारे पुढाकार घेऊन निर्माण करण्यात आलेल्या या मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि स्टार्ट अप पोर्तुगाल यांचे पाठबळ आहे.उद्योजकतेसाठी भागीदारी करण्याच्या दृष्टीने हा मंच निर्माण करण्यात आला आहे.पोर्तुगालच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांचे प्रेस निवेदन
June 24th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पोर्तुगीज पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी अनेक क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, स्टार्ट-अप क्षेत्र हे सहकार्यासाठी एक खूप चांगले ठिकाण आहे. ते समाजासाठी मूल्य आणि संपत्ती निर्मितीचे साधन आहे.” ते पुढे म्हणाले की करव्यवस्था, विज्ञान, युवा व्यवहार, आणि क्रीडा क्षेत्रांत अधिक भागीदारी करण्यासाठी करार करण्यांत आले आहेत.