पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये द्वारका इथल्या ‘यशोभूमी’, या भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार
September 15th, 04:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता द्वारका, नवी दिल्ली येथे 'यशोभूमी' इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी द्वारका सेक्टर 21 आणि यशोभूमी द्वारका सेक्टर 25 येथील नवीन मेट्रो स्थानक यांना जोडणाऱ्या दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गाच्या विस्तारित मार्गीकेचे उद्घाटनही करतील.विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत, पारंपारिक कला कौशल्याचे काम करणाऱ्यांसाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा करणार प्रारंभ
September 15th, 12:36 pm
विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे “पीएम विश्वकर्मा” या नवीन योजनेचा शुभारंभ करणार आहेत.Focus on modernisation of infrastructure is driven by increasing ease of living for the people: PM
June 19th, 10:31 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.PM dedicates Pragati Maidan Integrated Transit Corridor project
June 19th, 10:30 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
September 20th, 04:48 pm
संपूर्ण देश गणपती उत्सवात मग्न आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी भगवान गणेशाचे स्मरण करूनच सुरवात करतात. भव्य-दिव्य भारताचे मोठे प्रतिक, नव भारतासाठी एका महत्वाच्या केंद्राचा आज श्री गणेशा करण्याची ही उपयुक्त संधी आहे.पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी
September 20th, 04:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील द्वारका येथे भारत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ॲण्ड एक्स्पो सेंटरची (IICC) पायाभरणी केली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती भारताची सजगता, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती आयआयसीसी प्रतिबिंबित करेल. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुलभतेला महत्त्व देण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे, असेही ते म्हणाले.पंतप्रधान नवी दिल्लीत 20 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राची पायाभरणी करणार
September 19th, 02:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राची (IICC) पायाभरणी करणार आहेत. देशात औद्योगिक विकासाच्या वाढीसाठी व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन आणि आकर्षित करण्यासाठी बैठका, परिषदा आणि प्रदर्शन भरवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून आयआयसीसी विकसित केले जात आहे. नवी दिल्लीतील द्वारका येथे सेक्टर 25 येथे 221.37 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी अंदाजे 25,703 कोटी रुपये खर्च येणार आहे.