पंतप्रधानांनी ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला

February 06th, 09:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोवा येथे भारत ऊर्जा सप्ताहादरम्यान ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

‘भारत ऊर्जा सप्ताह 2024, गोवा’ उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 06th, 12:00 pm

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे युवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, रामेश्वर तेली जी, वेगवेगळ्या देशांतून आलेले प्रतिनिधी, भगिनी आणि सद्गृहस्थ हो !

पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन

February 06th, 11:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन केले. भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद आहे. भारताच्या ऊर्जा संक्रमण उद्दिष्टांना चालना देण्यासाठी संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीला ही परिषद एका मंचावर आणते. पंतप्रधानांनी, जागतिक तेल आणि वायू मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांसोबत गोलमेज बैठकही घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारीला गोव्याला भेट देणार

February 05th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्याला भेट देणार आहेत. साधारण सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान ओ एन जी सी सी सर्व्हायव्हल सेंटरचे उदघाटन करतील. पावणे आकाराच्या सुमारास, पंतप्रधानांच्या हस्ते भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उदघाटन होणार आहे. त्यांनतर दुपारी 2:45 वाजता, ते विकसित भारत, विकसित गोवा 2047 कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे आयोजित इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये पंतप्रधानांचे भाषण

February 06th, 11:50 am

आता या वेळी आपल्या सर्वांच्या नजरा तुर्कस्तानमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपाकडे लागल्या आहेत. अनेक लोक मृत्यूमुखी पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत. तुर्कस्तानच्या आजूबाजूच्या देशांमध्येही नुकसान होईल, अशी शक्यता आहे. भारतातील 140 कोटी जनतेची सहानुभूती या भूकंपग्रस्तांना आहे. या भूकंपग्रस्तांची सर्वतोपरी मदत करायला भारत तत्पर आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह 2023 चे उद्घाटन

February 06th, 11:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह (आयईडब्ल्यू)2023 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय तेल महामंडळाच्या ‘अनबॉटल्ड’उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या गणवेशांचे अनावरण केले. हे गणवेश पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहेत. भारतीय तेल महामंडळाद्वारे निर्मित अंतर्गत सौर कुकिंग प्रणालीच्या ट्वीन कुकटॉप मॉडेलचे देखील पंतप्रधानांनी लोकार्पण केले आणि या मॉडेलच्या व्यावसायिक पातळीवरील विक्रीचा प्रारंभ केला.