पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथे भारतीय समुदायाला केलेले संबोधन

July 10th, 11:00 pm

सुरवात करू मी ? ऑस्ट्रियाचे सन्माननीय अर्थव्यवस्था विभाग आणि श्रम मंत्री, भारतीय समुदायाचा माझा सर्व मित्रवर्ग,शुभचिंतक आपणा सर्वाना नमस्कार.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया येथील भारतीय समुदायाला संबोधित केले

July 10th, 10:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हिएन्ना येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.व्हिएन्ना येथे आगमन झाल्यानंतर तेथील समुदायाने विशेष स्नेहाने आणि आपुलकीने पंतप्रधानांचे स्वागत केले.ऑस्ट्रियाचे श्रम आणि अर्थव्यवस्था विभागाचे मंत्री मार्टिन कोचर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण ऑस्ट्रियातील विविध ठिकाणचे भारतीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया-भारत सीईओंच्या बैठकीला केले संबोधित

July 10th, 07:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी आज पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल, ऊर्जा, अभियांत्रिकी आणि स्टार्ट-अप्ससह विविध क्षेत्रातील आघाडीच्या ऑस्ट्रियन आणि भारतीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) गटाला संयुक्तपणे संबोधित केले.