भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या महान व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली
March 12th, 03:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य चळवळीतील सर्व स्वातंत्र्यसैनिक, चळवळ, उठाव आणि संघर्ष यांना आदरांजली वाहिली. त्यांनी चळवळी, संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वांना विशेष आदरांजली वाहिली , ज्यांना भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढय़ातील कथेत योग्य ओळख मिळाली नाही. आज अहमदाबादच्या साबरमती आश्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (भारत @ 75) सुरू केल्यानंतर ते बोलत होते.‘आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.अमृत महोत्सव कार्यक्रमला साबरमती आश्रमातून प्रारंभ होणार : पंतप्रधान
March 12th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद मधल्या साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा ) प्रारंभ करणार आहेत.‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’संबंधित उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते 12 मार्च रोजी उद्घाटन
March 11th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12मार्च 2021 रोजी साबरमती आश्रम, अहमदाबाद येथे झेंडा दाखवून ‘पदयात्रे’ला ( स्वातंत्र्य यात्रा ) रवाना करणार आहेत. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ची (भारत @75) रंगीत तालीम असलेल्या उपक्रमांचे उदघाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. भारत @75 उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान विविध अन्य सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उदघाटन करणार आहेत. आणि ते साबरमती आश्रम येथे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. सकाळी 10:30 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) श्री प्रल्हादसिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित राहतील.