प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा जुलै, 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 09th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनासह सरकारच्या सर्व योजनांअंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा सार्वत्रिक पुरवठा सध्याच्या स्वरूपात जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
August 16th, 05:42 pm
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
August 15th, 09:20 pm
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले
August 15th, 03:04 pm
त्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे:78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
August 15th, 01:09 pm
आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या, आयुष्यभर त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, फाशीच्या तख्तावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणाऱ्या, असंख्य स्वातंत्र्य प्रेमींना वंदन करण्याचा हा उत्सव आहे, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आज आपल्याला ह्या प्रसंगी स्वातंत्र्यासह श्वास घेण्याचे भाग्य दिले आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक महान व्यक्तीप्रती आपण श्रद्धेची भावना व्यक्त करूया.दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील 78 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची झलक
August 15th, 10:39 am
पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात भारताच्या भविष्याबद्दलच्या व्हिजनची रुपरेषा मांडली. 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापासून ते धर्मनिरपेक्ष नागरी संहिता अंमलात आणण्यापर्यंतच्या मुद्द्यांसह भारताची सामूहिक प्रगती आणि प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण यावर पंतप्रधान मोदींनी प्रकर्षाने भर दिला. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा नव्या जोमाने सुरू ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नवोन्मेष, शिक्षण आणि जागतिक नेतृत्व या गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्यास 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताच्या भविष्यासाठी मांडला महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन
August 15th, 10:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात, भारताच्या विकासाला आकार देणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने भविष्यकालीन उद्दिष्टांची मालिका रेखाटली.भारतात साजरा झालेला 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा
August 15th, 07:30 am
पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात भारताच्या भविष्याबद्दलच्या व्हिजनची रुपरेषा मांडली. 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापासून ते धर्मनिरपेक्ष नागरी संहिता अंमलात आणण्यापर्यंतच्या मुद्द्यांसह भारताची सामूहिक प्रगती आणि प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण यावर पंतप्रधान मोदींनी प्रकर्षाने भर दिला. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा नव्या जोमाने सुरू ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नवोन्मेष, शिक्षण आणि जागतिक नेतृत्व या गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्यास 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
August 15th, 07:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केलेले संबोधन आपल्याला समृद्ध आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करत राहण्याची प्रेरणा देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
August 14th, 09:05 pm
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केलेले संबोधन आपल्याला समृद्ध आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करत राहण्याची प्रेरणा देते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.समाजमाध्यमांवर आपल्या प्रोफाईल छायाचित्राच्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
August 09th, 09:01 am
नागरिकांनी समाज माध्यम मंचावर आपल्या प्रोफाईल छायाचित्रामध्ये बदल करून त्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोदी यांनी त्यांचे प्रोफाईल छायाचित्र बदलून त्या जागी तिरंगा असलेले प्रोफाईल छायाचित्र ठेवले आहे. त्यांनी सर्वांनाच असे करून हर घर तिरंगा चळवळ एक संस्मरणीय लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांनी प्रत्येकाला harghartiranga.com वर तिरंगा ध्वजासोबतचे सेल्फी छायाचित्र सामाईक करण्याचे देखील आवाहन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पिंगली वेंकय्या यांना जयंतीनिमित्त आदरांजली
August 02nd, 02:02 pm
पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त, देशाला तिरंगी ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पिंगली वेंकय्या यांना आदरांजली अर्पण केली. हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगी झेंडा फडकावून आपापले सेल्फी काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले आहे.पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी तुमच्या सूचना पाठवा
August 01st, 05:55 pm
भारतात 15 ऑगस्ट 2024 रोजी साजऱ्या होणाऱ्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असल्याच्या पार्श्र्वभूमीवर या दिवशी पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी तुमच्या मौलिक कल्पना आणि सूचना शेअर करून राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे असे आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत.'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त वाहिली आदरांजली.
July 23rd, 09:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त अभिवादन केले आहे. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावेळी केलेले भाषण देखील सामायिक केले आहे.संयुक्त अरब अमिराती मध्ये अबू धाबी इथे अहलान मोदी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 13th, 11:19 pm
आज अबू धाबी मध्ये आपण सर्वांनी नवा इतिहास घडवला आहे.आपण सर्वजण संयुक्त अरब अमिरातीच्या विविध भागातून आले आहात आणि भारताच्या विविध राज्यांमधून आला आहात.मात्र आपण सर्वजण मनाने जोडलेले आहात.या ऐतिहासिक स्टेडीयममध्ये प्रत्येक जण मनापासून हेच म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद !प्रत्येक श्वासागणिक म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! प्रत्येक आवाज म्हणत आहे, भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! हा एक क्षण अनुभवायचा आहे.भरभरून जगायचा आहे.आपल्या बरोबर आयुष्यभर राहतील अशा आठवणी आज इथून घेऊन जायच्या आहेत.संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदायाच्या "अहलान मोदी" या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद
February 13th, 08:30 pm
संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात 7 अमिरातीमधील अनिवासी भारतीय सहभागी झाले होते आणि त्यात सर्व समुदायातील भारतीयांचा समावेश होता. प्रेक्षकांमध्ये अमिराती मधील नागरिकांचाही समावेश होता.पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार
December 31st, 12:56 pm
2 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, नौवहन तसेच उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान लक्षद्वीप मधील अगत्ती येथे पोहोचतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. 3 जानेवारी, 2024 रोजी, दुपारी 12 वाजता, पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे पोहोचतील. लक्षद्वीपशी येथील कार्यक्रमात ते दूरसंचार, पेयजल, सौर ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.जम्मूमधील सीमावर्ती भागातील,समर्पित वृत्तीने आपले काम करणाऱ्या महिला सरपंचाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
November 30th, 01:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही शुभारंभ केला. सुरू केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी देवघर इथल्या एम्स रुग्णालयात 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही सुरू केला. पंतप्रधानांनी या दोन्ही उपक्रमांची आज घोषणा केली, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याची खूणगाठ दर्शविणारा हा कार्यक्रम आहे.