भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (IndAus ECTA) अंमलात येत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
December 29th, 06:44 pm
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (IndAus ECTA) आजपासून अंमलात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी हा महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराप्रसंगी (IndAus ECTA) दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या स्वाक्षरी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला अभिप्राय
April 02nd, 10:01 am
आज, माझे मित्र स्कॉट यांच्यासोबत एका महिन्यापेक्षाही कमी काळात झालेला हा माझा तिसरा समोरासमोर केलेला संवाद आहे. गेल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या परिषदेत आमची अतिशय फलदायी अशी चर्चा झाली. त्यावेळी, आम्ही आमच्या समूहातील सदस्यांना लवकरात लवकर आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आणि आज या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मी दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार-(IndAus ECTA) वर स्वाक्षरी
April 02nd, 10:00 am
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (“IndAus ECTA”) भारताचेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूकमंत्री डॅन तेहान, यांनी एका आभासी पध्दतीने झालेल्या समारंभात स्वाक्षरी केली.