‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 10:30 am
जेव्हा आपण आरोग्याविषयी चर्चा करतो, तेव्हा या विषयाकडे, कोविडपूर्व काळ आणि कोविडोत्तर असं विभागून बघायला हवं. कोविडने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि शिकवलं देखील की जेव्हा इतकं मोठं संकट येतं तेव्हा समृद्ध देशाच्या विकसित व्यवस्था सुद्धा उध्वस्त होतात. जग आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त लक्ष आरोग्य सेवेकडे देऊ लागलं आहे, मात्र भारताचा दृष्टीकोन फक्त आरोग्य सेवेपुरताच मर्यादित नाही, तर आपण एक पाऊल पुढे जाऊन निरामयतेसाठी देखील काम करत आहोत. म्हणून आपण जगासमोर एक विचार ठेवला आहे - एक पृथ्वी - एक आरोग्य. म्हणजे जीव सृष्टीसाठी, मग ते मनुष्य असो की प्राणी असो, वृक्षं असोत, सर्वांसाठी एक सर्वंकष आरोग्य सेवेचा विचार आहे. कोविड जागतिक महामारीने आपल्याला हे देखील शिकवलं आहे, की पुरवठा साखळी, किती महत्वपूर्ण विषय बनला आहे. जेव्हा जागतिक महामारी टिपेला होती, तेव्हा काही देशांसाठी औषधं, लसी, वैद्यकीय उपकरणं, अशा जीवन रक्षक गोष्टी दुर्दैवानं हत्यार बनल्या होत्या. गेल्या वर्षांच्या अर्थसंकल्पात भारतानं या सगळ्या विषयांवर खूप लक्ष दिलं आहे. आम्ही सातत्यानं परदेशांवर असलेली अवलंबिता कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत सर्वच भागधारकांची भूमिका फार मोठी आहे.आरोग्य आणि वैद्यकीय संशोधनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील हा नववा भाग आहे.उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 07th, 01:10 pm
धर्म, अध्यात्म आणि क्रांतीची नगरी असलेल्या गोरखपूरच्या देवतुल्य लोकांना मी वंदन करतो. परमहंस योगानंद, महायोगी गोरखनाथ जी, वंदनीय हनुमान प्रसाद पोद्दार जी, आणि महा बलीदानी पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या या पवित्र भूमीला कोटी-कोटी नमन! तुम्हा सर्व मंडळींना खत कारखाना आणि एम्ससाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागली. मात्र आज या प्रकल्पांच्या पूर्ततेची वेळ आली आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन!!पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात गोरखपूरमधील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण
December 07th, 01:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.देशातील कोविड-19 स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न
April 27th, 08:25 pm
देशातील कोविड-19 विषयक सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. देशातील प्राणवायूची उपलब्धता, औषधे, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा इत्यादी बाबींचा त्यांनी परामर्श घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषध निर्मिती क्षेत्रातल्या प्रमुखांशी साधला संवाद
April 19th, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषध निर्मिती क्षेत्रातल्या प्रमुखांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना महामारीविरोधातल्या लढ्यात औषध निर्मिती क्षेत्राच्या महत्वाच्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.कोविड -19 चा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या तयारीबाबत देशातल्या मान्यवर डॉक्टरांबरोबर पंतप्रधानांनी केली चर्चा
April 19th, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 शी संबंधित मुद्दे आणि लसीकरणाच्या प्रगतीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील डॉक्टरांसोबत आज चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात अमूल्य सेवा दिल्याबद्दल डॉक्टर्स, चिकित्सा कर्मचारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.पंतप्रधानांनी हैदराबादमधील भारत बायोटेकला दिली भेट
November 28th, 03:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठीच्या तीन शहरांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान आज हैदराबाद मधील भारत बायोटेक सुविधा केंद्राला भेट दिली.पंतप्रधानांनी कोविड-19 लसीचे वितरण, वाटप आणि व्यवस्थापन यांचा घेतला आढावा
November 20th, 10:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड – 19 च्या लसीचे वितरण, वाटप आणि व्यवस्थापन याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. लस विकसित करण्यासाठी संशोधन, शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि औषध कंपन्यांनी घेतलेल्या कष्टाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि लसीचे संशोधन, विकास आणि उत्पादन सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे निर्देश दिले आहेत.‘यूएसआयएसपीएफ’ शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विशेष बीज भाषण
September 03rd, 09:01 pm
यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम-अर्थात ‘यूएसआयएसपीएफ’च्यावतीने अमेरिका आणि भारत यांच्या 2020 च्या शिखर परिषदेमध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना एका व्यासपीठावर आणणे म्हणजे, एक निश्चितच अनोखे काम आहे. भारत आणि अमेरिका यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्यासाठी ‘यूएसआयएसपीएफ’च्यावतीने करण्यात येत असलेले निरंतर प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहेत.अमेरिकन आयएसपीएफने आयोजित केलेल्या भारत-अमेरिका 2020 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण
September 03rd, 09:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-अमेरिका शिखर परिषद 2020 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बीजभाषण केले.देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेले संबोधन
August 15th, 02:49 pm
स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र प्रसंगी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो मुलामुलींचे त्याग, बलिदान, आणि भारतमातेला स्वतंत्र बनवण्याप्रती त्यांचा संकल्प, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, नरवीरांना, शहीदांना वंदन करण्याचे हे पर्व आहे. आपले सैन्यातील शूर जवान, निमलष्करी जवान, पोलीस, सुरक्षा दलाशी संबंधित प्रत्येकजण, भारतमातेच्या रक्षणात सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात, आज त्या सर्वांना हृदयपूर्वक, आदरपूर्वक स्मरण करण्याचा, त्यांच्या महान त्याग तपस्येला वंदन करण्याचे पर्व आहे.74 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण
August 15th, 02:38 pm
माझ्या प्रिय देशबांधवांनो ,स्वातंत्र्यदिनाच्या या मंगल प्रसंगी मी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.India celebrates 74th Independence Day
August 15th, 07:11 am
Prime Minister Narendra Modi addressed the nation on the occasion of 74th Independence Day. PM Modi said that 130 crore countrymen should pledge to become self-reliant. He said that it is not just a word but a mantra for 130 crore Indians. “Like every young adult in an Indian family is asked to be self-dependent, India as nation has embarked on the journey to be Aatmanirbhar”, said the PM.PM to launch High Throughput COVID-19 testing facilities on 27 July
July 26th, 02:51 pm
Prime Minister Shri Narendra Modi will launch high throughput COVID-19 testing facilities on 27th July via video conferencing. These facilities will ramp up testing capacity in the country and help in strengthening early detection and treatment, thus assisting in controlling the spread of the pandemic.