लक्षद्वीपच्या अगत्ती विमानतळावर सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 02nd, 04:45 pm
लक्षद्वीप अनेक संधींनी परिपूर्ण आहे. मात्र नौवहन ही येथील जीवनरेखा असली तरी स्वातंत्र्यानंतर बराच काळ लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. परंतु येथील बंदराची पायाभूत सुविधाही कमकुवतच राहिली. शिक्षण असो, आरोग्य असो, अगदी पेट्रोल-डिझेलसाठीही खूप त्रास सहन करावा लागत होता. आमचे सरकार आता या सर्व आव्हानांना तोंड देत आहे. लक्षद्वीपची पहिली बंदरावरील मालवाहतुकीची मोठ्या प्रमाणावरील साठवण सुविधा कावरत्ती आणि मिनिकॉय बेटावर बांधण्यात आली आहे. आता येथे अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.लक्षद्वीपच्या अगत्ती विमानतळावर पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक कार्यक्रमाला केले संबोधित
January 02nd, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमधील अगत्ती विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेचच एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान रात्री लक्षद्वीपमध्ये मुक्काम करणार आहेत.