गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्मयोगी सप्ताह’ - राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ
October 19th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला.राष्ट्रकुल विधी शिक्षण संघटना -राष्ट्रकुल ऍटॉर्नी आणि सॉलिसिटर जनरल्स परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण
February 03rd, 11:00 am
प्रतिष्ठित कायदेतज्ञ , जगभरातील विविध देशांमधील अतिथी आणि उपस्थित मान्यवर सदस्यगण, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सीएलईए - कॉमनवेल्थ ॲटर्नी एंड सॉलिसिटर जनरल परिषद 2024 चे उद्घाटन
February 03rd, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे, कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए) - कॉमनवेल्थ ॲटर्नी एन्ड सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स (सीएएसजीसी) 2024, अर्थात राष्ट्रकुल कायदे शिक्षण संघटना- राष्ट्रकुल विधिज्ञ आणि महा न्याय अधिकर्ता परिषदेचे उद्घाटन केले. ‘न्याय वितरणापुढील सीमापार आव्हाने’, ही या परिषदेची संकल्पना असून, यामध्ये कायदा आणि न्याय विषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. न्याय प्रक्रियेतील संक्रमण आणि वकिली व्यवसायाचे नैतिक पैलू, कामकाजातील उत्तरदायित्व, आणि आधुनिक काळातील कायदे विषयक शिक्षणाची पुनर्रओळख या आणि अन्य विषयांचा यात समावेश असेल.आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
March 10th, 09:43 pm
आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधनआपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाच्या तिसऱ्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
March 10th, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीचा राष्ट्रीय मंच (NPDRR)च्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन केले. या तिसऱ्या सत्राची मुख्य संकल्पना, “बदलत्या हवामानात, स्थानिक पातळीवरील प्रतिबंधक आणि संरक्षक क्षमता वाढवणे” अशी आहे.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 09th, 02:15 pm
राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होऊन मी आदरणीय राष्ट्रपतीजींचे आदरपूर्वक आभार मानतो. आदरणीय राष्ट्रपतीजींचे अभिनंदन करतो. आदरणीय सभापतीजी, दोन्ही सदनांना संबोधित करत त्यांनी विकसित भारताची रुपरेषा आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी एक पथदर्शक आराखडा सादर केला आहे.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिले उत्तर
February 09th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला उत्तर दिले. आपल्या अभिभाषणात ‘विकसित भारता’चे दर्शन सादर करत दोन्ही सभागृहांना मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानून, पंतप्रधानांनी उत्तराची सुरुवात केली.The 'Panch Pran' must be the guiding force for good governance: PM Modi
October 28th, 10:31 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.PM addresses ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States
October 28th, 10:30 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.लॉजिस्टिक्स सेवांमधील अधिक कार्यक्षमतेसाठी एकीकृत लॉजिस्टिक इंटरफेस मंच, मानकीकरण, देखरेख आराखडा आणि कौशल्य विकासाचा समावेश असलेल्या राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
September 21st, 04:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणाला मंजुरी दिली . हे धोरण लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी एक व्यापक आंतरविद्याशाखीय, क्रॉस-सेक्टरल , बहु-अधिकार क्षेत्रीय आणि व्यापक धोरण आराखडा प्रदान करते. हे धोरण पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला पूरक आहे. एकात्मिक पायाभूत सुविधांचा विकास हे गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याचे उद्दिष्ट आहे तर सुव्यवस्थित प्रक्रिया, नियामक आराखडा, कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि आणि योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब या माध्यमातून लॉजिस्टिक्स सेवा आणि मानवी संसाधनांमध्ये कार्यक्षमता आणण्याची संकल्पना राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणामध्ये मांडण्यात आली आहे.मालदीवच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यानचे भारत-मालदीव संयुक्त निवेदन
August 02nd, 10:18 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महामहीम श्री इब्राहीम मोहमद सोलिह भारताच्या औपचारिक भेटीवर आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम समदेक अक्का मोह सेना पडेई टेको हुन सेन यांच्यात आभासी बैठक
May 18th, 08:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम समदेक अक्का मोह सेना पडेई टेको हुन सेन, यांच्यासोबत एक आभासी बैठक घेतली दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, मनुष्यबळ विकास, संरक्षण आणि सुरक्षितता, विकास, संपर्क व्यवस्था , कोवीड साथीनंतरची आर्थिक सुधारणा आणि दोन्ही देशांतील लोकांचे परस्पर अनुबंध या क्षेत्रातील सहकार्यासह व्यापक स्वरूपाच्या द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. द्विपक्षीय सहकार्याच्या गतीबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.आरोग्य क्षेत्रावर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा सकारात्मक परिणाम या वरच्या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 26th, 02:08 pm
मंत्रिमंडळातले माझे सहकारी, देशभरातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक, आरोग्य व्यवस्थापक, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडले गेलेले महनीय, महिला आणि सज्जन हो!पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन
February 26th, 09:35 am
पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नंतर पंतप्रधानांचे वक्तव्य
February 01st, 03:01 pm
वर्ष 2021 चा अर्थसंकल्प विलक्षण परिस्थितीत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात वास्तविकतेची भावना आणि विकासाबद्दल आत्मविश्वास देखील आहे. जगातील कोरोनाच्या प्रभावामुळे संपूर्ण मानवजाती हादरली आहे. अशा परिस्थितीत आजचा हा अर्थसंकल्प भारताचा आत्मविश्वास उंचावणार आहे. आणि त्याच वेळी, जगामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करणारा अर्थसंकल्प देखील आहे.अर्थसंकल्पातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो- पंतप्रधान
February 01st, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात वास्तविकतेची जाणीव आणि विकासाचा आत्मविश्वास आहे आणि यातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो. या कठीण काळात हा अर्थसंकल्प जगात एक नवीन आत्मविश्वास घेऊन येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.मिशन कर्मयोगीमुळे सरकारमधील मनुष्यबळ व्यवस्थापनात मुलभूत सुधारणा घडून येणार : पंतप्रधान
September 02nd, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीट संदेशात म्हणाले, मिशन कर्मयोगी-नागरी सेवा क्षमता वृद्धींगत कार्यक्रमामुळे सरकारमधील मनुष्यबळ व्यवस्थापनात मुलभूत परिवर्तन घडून येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी हे प्रमाणित आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा वापर करेल.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या अंतीम फेरी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 01st, 04:47 pm
आपण सर्वजण एकापेक्षा एक पर्यायांच्या, समाधानांच्या शोधासाठी काम करीत आहात. देशासमोर आज जी आव्हाने आहेत, प्रश्न आहेत, त्यांच्यावर उत्तर तर नक्कीच शोधली जात आहेत ; डाटा, डिजिटाझेशन आणि हाय-टेक फ्यूचर यांच्याविषयी भारताच्या आकांक्षानाही बळकटी मिळत आहे.