कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड इथल्या विकास कामांचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 12th, 04:01 pm

मला या वर्षाच्या सुरुवातीलाही हुबळीला भेट देण्याचं भाग्य लाभलं. हुबळीच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून मला जे आशीर्वाद दिले, इतकं प्रेम, खूप आशीर्वाद दिले, ते मी कधीही विसरणार नाही. गेल्या काही काळात मला कर्नाटकच्या अनेक भागांना भेट देण्याची संधी मिळाली. बंगळूरू पासून ते बेळगावी पर्यंत, कलबुर्गी पासून ते शिमोगा पर्यंत, म्हैसूर पासून ते तुमकुरु पर्यंत, कन्नडिगा जनतेने मला जे अधिकाधिक प्रेम दिलं, आपलेपणा दिला, आपलं हे प्रेम, आपले आशीर्वाद भारावून टाकणारे आहेत. आपलं हे प्रेम माझ्यावर मोठं ऋण आहे, कर्ज आहे, आणि कर्नाटकच्या जनतेची सातत्त्याने सेवा करून मी या कर्जाची परतफेड करणार आहे. कर्नाटकच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद असावा, इथल्या युवा वर्गाला सतत पुढे जाण्यासाठी, रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्यात, इथल्या माता-भगिनी अधिक सक्षम व्हाव्यात, याच दिशेने आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत. भाजपाचं डबल इंजिन सरकार, कर्नाटकचा प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीच्या संपूर्ण विकासाकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आज धारवाडच्या या भूमीवर विकासाचा एक नवा प्रवाह सुरु होत आहे. विकासाचा हा प्रवाह हुबळी, धारवाड बरोबरच, संपूर्ण कर्नाटकच्या भविष्याचं सिंचन करण्याचं, त्याला फुलवण्याचं, भरभराटीला आणण्याचं काम करेल.

कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड येथे पंतप्रधानांकडून महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण आयआयटी धारवाडचे केले लोकार्पण

March 12th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मध्ये हुबळी धारवाड येथे महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. लोकार्पण केलेल्या या प्रकल्पांमध्ये आयआयटी धारवाडचा समावेश आहे ज्याची पायाभरणी पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती तसेच श्री सिद्धारूढ स्वामीजी हुबळी स्थानका मधील 1507 मीटर लांबीचा जगातील सर्वात जास्त लांब रेल्वे फलाट म्हणून ज्याला अलीकडेच जागतिक विक्रमांच्या गिनेस बुकने मान्यता दिली आहे तो प्रकल्प आणि होस्पेट हुबळी तिनईघाट सेक्शनचे विद्युतीकरण आणि या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी होस्पेट रेल्वे स्थानकाच्या दर्जात सुधारणा आदी प्रकल्पांचा समावेश होता.

पंतप्रधान कर्नाटकातील मंड्या आणि हुबळी-धारवाडला 12 मार्च रोजी देणार भेट

March 10th, 01:14 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी कर्नाटकला भेट देणार असून तिथे ते सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. दुपारी 12 वाजता पंतप्रधान मंड्या येथील प्रमुख रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता ते हुबळी-धारवाडमधील विविध विकास उपक्रमांचे लोकार्पण,उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

कर्नाटकमध्ये हुबळी येथे 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 12th, 04:30 pm

कर्नाटकचे हे क्षेत्र आपली परंपरा, संस्कृती आणि ज्ञान यासाठी प्रसिद्ध आहे. येथील अनेक विभूतींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या भागाने देशाला एकापेक्षा एक महान संगीतकार दिले आहेत. पंडित कुमार गंधर्व, पंडित बसवराज राजगुरु, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पंडिता गंगुबाई हनगल जींना मी आज हुबळीच्या भूमीवर येऊन नमन करत आपली श्रद्धांजली अर्पण करतो.

पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकात हुबळी इथे 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन

January 12th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकात हुबळी इथं 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं. स्वामी विवेकानंदाची जयंती म्हणून त्यांचे आदर्श, त्यांची शिकवण आणि देश उभारणीत त्यांचे योगदान याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 जानेवारी हा दिवस देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित संमेलनाची संकल्पना, ‘विकसित युवा-विकसित भारत’ अशी असून, देशाच्या सर्व भागातील विविधांगी संस्कृती एका मंचावर आणून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे तत्व अधिक बळकट करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.