पंतप्रधान 8 सप्टेंबर रोजी 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण
September 07th, 01:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन करणार आहेत. सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून बदलले जाणार आहे. याप्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. ही पावले ‘वसाहतवादी मानसिकतेचा कोणताही लवलेश मागे ठेवू नका’ या पंतप्रधानाच्या अमृत कालमधील नव भारताच्या दुसऱ्या ‘पंच प्रणा’ शी सुसंगत आहेत.केंद्रीय अर्थसंकल्पाचा ग्रामीण विकासावर सकारात्मक परिणाम या विषयावरील वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 23rd, 05:24 pm
Prime Minister Narendra Modi paid tribute to Netaji Subhas Chandra Bose on his 125th birth anniversary. Addressing the gathering, he said, The grand statue of Netaji, who had established the first independent government on the soil of India, and who gave us the confidence of achieving a sovereign and strong India, is being installed in digital form near India Gate. Soon this hologram statue will be replaced by a granite statue.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींच्या होलोग्रॅम पुतळ्याचे अनावरण; तसेच सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांचेही वितरण
January 23rd, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रॅम पुतळ्याचे अनावरण झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ग्रॅनाईटच्या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत, हा होलोग्रॅमचा पुतळा तिथे राहणार आहे. नेताजींच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, याच ठिकाणी ग्रॅनाईटचा पुतळा बसवला जाणार आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यासाठी इंडिया गेट येथे नेताजींचा एक भव्य पुतळा बसवण्यात येणार
January 21st, 07:46 pm
महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आणि वर्षभर चालणाऱ्या उत्सवांचा एक भाग म्हणून सरकारने इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुतळा ग्रॅनाइटपासून बनवलेला असून स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला अतिशय समर्पक अभिवादन ठरेल आणि त्यांच्याविषयीच्या देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल. हा पुतळा तयार होईपर्यंत त्याच जागी नेताजींचा हॉलोग्राम पुतळा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजता इंडिया गेट येथे नेताजींच्या हॉलोग्राम पुतळ्याचे अनावरण करतील.इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार : पंतप्रधान
January 21st, 03:00 pm
नवी दिल्ली येथील इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र यांचा पुतळा घडविण्याचे काम सुरु आहे. म्हणून नेताजीच्या जयंती दिनी 23 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान, याच पुतळ्याचा त्रिमित परिणाम साधणाऱ्या होलोग्रामचे अनावरण करणार आहेत.