PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21st, 01:18 pm
PM Modi congratulated the Indian Women's Hockey Team on winning the Asian Champions Trophy, praising their exceptional performance and highlighting how their success will inspire future athletes.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मुंबईत झालेल्या 141व्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 14th, 10:34 pm
140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे या विशेष आयोजनात स्वागत करतो, अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनच्या या 141 व्या सत्राचे भारतात आयोजन होणे अतिशय विशेष आहे. 40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे हे सत्र आयोजित होणे आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.पंतप्रधानांनी 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे मुंबईत केले उद्घाटन
October 14th, 06:35 pm
भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा खेळ हा एक महत्त्वाचा भाग असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्यावेळी तुम्ही भारतातील गावांमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला खेळाशिवाय कोणताही सण हा अपूर्ण असल्याचे दिसेल असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत पण आम्ही खेळ जगत असतो असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये प्रतिबिंबित होत असलेली क्रीडा संस्कृती अधोरेखित केली मग ती सिंधू संस्कृती असेल वेदिक कालखंड असेल किंवा त्यानंतरचा कालखंड असेल भारताचा क्रीडा वारसा हा अतिशय समृद्ध राहिला आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.पुरुषांच्या हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन
September 03rd, 10:11 am
पुरुषांच्या हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.भारतीय पुरुष हॉकी संघाने मिळविलेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
August 12th, 11:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे.पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे केले अभिनंदन
June 02nd, 08:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे पुरुष ज्युनियर आशिया चषक स्पर्धेतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
January 11th, 07:37 pm
ओडिशा येथे सुरु होत असलेल्या हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व संघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.Success starts with action: PM Modi at inauguration of National Games
September 29th, 10:13 pm
PM Modi declared the 36th National Games open, which is being held in Gujarat. He reiterated the importance of sports in national life. “The victory of the players in the field of play, their strong performance, also paves the way for the victory of the country in other fields. The soft power of sports enhances the country's identity and image manifold.”PM Modi declares open the 36th National Games in Ahmedabad, Gujarat
September 29th, 07:34 pm
PM Modi declared the 36th National Games open, which is being held in Gujarat. He reiterated the importance of sports in national life. “The victory of the players in the field of play, their strong performance, also paves the way for the victory of the country in other fields. The soft power of sports enhances the country's identity and image manifold.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
August 29th, 11:30 am
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.Exclusive Pictures! PM Modi meets Olympians who made India proud!
August 16th, 10:56 am
A day after praising them from the ramparts of the Red Fort and getting the whole nation to applaud them, Prime Minister Narendra Modi met the Indian athletes who participated in the Olympics and made India proud.Here are some exclusive pictures from the event!पंतप्रधानांकडून टोक्यो 2020 मधील सर्वोत्तम प्रदर्शनासाठी भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन
August 08th, 06:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन केले आहे. टोक्यो 2020 च्या समारोनिमित्त पंतप्रधान म्हणाले, भारताचे प्रतिनिधीत्व केलेला प्रत्येक क्रीडापटू चॅम्पियन आहे.खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण – पंतप्रधान
August 06th, 02:15 pm
खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूचे पंतप्रधानांकडून कौतुक
August 05th, 08:36 pm
भारतीय हॉकी संघाने देशाला ऑलिंपिक्समधील कांस्य पदक मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि मनात हॉकीला खास स्थान असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. प्रत्येक हॉकीप्रेमीच्या तसेच क्रीडाप्रेमींच्या मनात 5 ऑगस्ट 2021 हा संस्मरणीय दिवस म्हणून कोरला जाईल असे पंतप्रधान म्हणाले.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
August 05th, 01:01 pm
आज आपल्या सर्वांशी संवाद साधून खूप समाधान वाटले.समाधान याचे की दिल्लीहून धान्याचा जो एकेक दाणा पाठवला होता, तो प्रत्येक लाभार्थ्याच्या ताटात पोचतो आहे. समाधान याचेही, की आधीच्या सरकारांच्या काळात, उत्तरप्रदेशात गरिबांच्या अन्नाची जी लूट होत होती, त्यासाठी आता कुठलाही मार्ग उरलेला नाही. उत्तरप्रदेशात आता ज्या प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलबजावणी केली जात आहे, ती नव्या उत्तरप्रदेशाची ओळख आणखी भक्कम करत आहे. मला तुमच्याशी बोलतांना खूप आनंदही होत होता. ज्या हिमतीने आपण सगळे बोलत होतात, ज्या विश्वासाने बोलत होता, त्यामुळे फार चांगले वाटले. तसेच, आपल्या प्रत्येक शब्दातून सच्चेपणा जाणवत होता. त्यामुळेही मला खूप समाधान मिळाले. आपल्या सर्वांसाठी काम करण्याचा माझा उत्साह आज आणखी दुणावला आहे. चला, आपण अशा गप्पा कितीही वेळ मारू शकतो, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया.पंतप्रधानांचा उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद
August 05th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 05th, 09:49 am
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, या विजयामुळे त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये विशेषत: आपल्या तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.टोक्यो 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली आणि ते महत्वपूर्ण आहे : पंतप्रधान
August 03rd, 11:46 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणाले की, टोक्यो मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली असून आपल्या दृष्टीने तेच महत्वपूर्ण आहे. त्यांनी संघाला आगामी सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे : पंतप्रधान
August 02nd, 12:03 pm
आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
February 28th, 11:00 am
During Mann Ki Baat, PM Modi, while highlighting the innovative spirit among the country's youth to become self-reliant, said, Aatmanirbhar Bharat has become a national spirit. PM Modi praised efforts of inpiduals from across the country for their innovations, plantation and biopersity conservation in Assam. He also shared a unique sports commentary in Sanskrit.