Text of PM Modi's address at the Parliament of Guyana

November 21st, 08:00 pm

Prime Minister Shri Narendra Modi addressed the National Assembly of the Parliament of Guyana today. He is the first Indian Prime Minister to do so. A special session of the Parliament was convened by Hon’ble Speaker Mr. Manzoor Nadir for the address.

PM Modi addresses the Parliament of Guyana

November 21st, 07:50 pm

Prime Minister Shri Narendra Modi addressed the National Assembly of the Parliament of Guyana today. He is the first Indian Prime Minister to do so. A special session of the Parliament was convened by Hon’ble Speaker Mr. Manzoor Nadir for the address.

आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

October 27th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हत्तींच्या संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या व्यापक सामुदायिक प्रयत्नांचे केले कौतुक

August 12th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने हत्तींच्या संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या व्यापक सामुदायिक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. हत्तींच्या वाढीसाठी अनुकूल असा अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

July 21st, 07:45 pm

आज भारत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत आहे. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना ज्ञान आणि आध्यात्माच्या या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. अशा महत्वपूर्ण दिनी आज 46 व्या जगतिक वारसा समितीच्या या बैठकीचा प्रारंभ होत आहे. आणि भारतात प्रथमच याचे आयोजन होत आहे. आणि स्वाभाविक आहे माझ्यासह सर्व देशवासियांना याचा विशेष आनंद आहे.मी याप्रसंगी जगभरातून आलेले सर्व मान्यवर आणि अतिथींचे स्वागत करतो. विशेषतः मी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे ऑज़ुले यांचेही अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, जागतिक स्तरावरील प्रत्येक आयोजनाप्रमाणे हा कार्यक्रम देखील भारतात यशाचे नवे विक्रम स्थापित करेल.

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन

July 21st, 07:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन केले. जागतिक वारसा समितीची दरवर्षी बैठक होते आणि जागतिक वारसा विषयक सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्याबरोबरच जागतिक वारसा यादीत नोंदवल्या जाणाऱ्या स्थळांचा निर्णय घेण्याचे दायित्व या समितीकडे असते.भारत प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करत आहे. यावेळी पंतप्रधानांनी विविध प्रदर्शनांना भेट देऊन आढावा घेतला.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रियन इंडोलॉजिस्टची घेतली भेट

July 10th, 09:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चार आघाडीच्या ऑस्ट्रियन इंडोलॉजिस्ट आणि भारतीय इतिहास आणि विचारांच्या विद्याप्रचुरकांची भेट घेतली. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि भाषातज्ञ डॉ. बिर्गिट केलनर; आधुनिक दक्षिण आशियाचे अभ्यासक प्रा. मार्टिन गेंस्ले; व्हिएन्ना विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यासाचे प्राध्यापक डॉ.बोरायिन लारियोस; आणि व्हिएन्ना विद्यापीठातील भारतीय विद्या विभागाचे प्रमुख डॉ. करिन प्रिसेंडान्झ यांच्याशी संवाद साधला.

संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 22nd, 05:12 pm

आज आपले राम आले आहेत, शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत, शतकांचे अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदाने, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगी, आपल्या सर्वांचे, समस्त देशबांधवांचे खूप खूप अभिनंदन !

अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान सहभागी

January 22nd, 01:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यात सहभागी झाले. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींशी मोदी यांनी संवाद साधला.

श्री राम मंदिराविषयी विशेष टपाल तिकीट आणि एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

January 18th, 02:10 pm

आज श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा अभियानशी संबंधित आणखी एका अद्भुत कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आज श्रीराम जन्मभूमि मंदिराला समर्पित 6 विशेष स्मारक टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत जगात विविध देशात प्रभु श्रीरामाशी संबंधित जी टपाल तिकीटे यापूर्वी जारी झाली आहेत, आज त्यांचा एक एल्बम देखील प्रकाशित झाला आहे. मी देश-विदेशातील सर्व रामभक्तांना, सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा देत आहे.

श्री राम जन्मभूमी मंदीराला समर्पित सहा टपाल तिकिटे पंतप्रधानांनी केली जारी

January 18th, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री राम जन्मभूमीशी संबंधित सहा विशेष टपाल तिकिटे जारी केली, त्याशिवाय, याआधी प्रभू रामाशी संबंधित घटनांबद्दल, जगातील इतर देशांनी जारी केलेल्या टपाल टिकीटांचा अल्बम (संग्रह) देखील त्यांनी जारी केला. भारत आणि परदेशातील सर्व राम भक्तांचे त्यांनी अभिनंदन केले.

वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

December 26th, 12:03 pm

आज देश वीर साहिबजादांच्या अमर बलिदानाचे स्मरण करत आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे.स्वातंत्र्याच्या अमृतकाळात वीर बाल दिवस रूपाने नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षी देशाने प्रथमच 26 डिसेंबर, वीर बाल दिवस म्हणून साजरा केला तेव्हा अवघ्या देशाने भाव विभोर होऊन साहिबजादांच्या वीर गाथा ऐकल्या होत्या. वीर बाल दिवस, भारतीयत्वाच्या रक्षणासाठी, कोणतीही सीमा न ठेवता कोणतेही कृत्य करण्याच्या संकल्पाचे प्रतिक आहे. अत्युच्च शौर्य गाजवताना लहान वय आड येत नाही याचे स्मरण आपल्याला हा दिवस करून देतो. हे या महान वारश्याचे पर्व आहे, जिथे गुरू म्हणतात -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमाला केले संबोधित

December 26th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिवस’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी मुलांनी सादर केलेले पठण आणि मार्शल आर्टची तीन प्रदर्शने पाहिली. यावेळी पंतप्रधानांनी दिल्लीतील तरुणांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संग्रहित कार्याच्या विमोचनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

December 25th, 04:31 pm

मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अनुराग ठाकूर जी, अर्जुन राम मेघवाल जी, महामना संपूर्ण वाङ्ग्मयाचे मुख्य संपादक माझे खूप जुने मित्र रामबहादुर राय जी, महामना मालवीय मिशनचे अध्यक्ष प्रभुनारायण श्रीवास्तव जी, मंचावर विराजमान सर्व ज्येष्ठ सहयोगी, बंधू आणि भगिनींनो,

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य' चे प्रकाशन

December 25th, 04:30 pm

महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य ' च्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचं प्रकाशन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना पुष्पांजली वाहिली. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींमत्वांमध्ये त्यांनी आघाडीचं स्थान प्राप्त केलं आहे. एक सर्वोत्कृष्ट विद्वान आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले मदन मोहन मालवीय यांचं जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केलं जाते.

लचित दिनानिमित्त पंतप्रधानांनी लचित बोरफुकन यांच्या शौर्याला केले अभिवादन

November 24th, 05:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना अभिवादन केले आहे. मोदी म्हणाले की, आज लचित दिनानिमित्त आपण लचित बोरफुकन यांच्या शौर्याचे स्मरण करतो. सराईघाटच्या लढाईतील त्यांनी केलेले असाधारण नेतृत्व, अशा समरप्रसंगी दाखवलेली तडफ म्हणजे कर्तव्याविषयी निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांचा वारसा हा आपल्या इतिहासाला आकार देणार्‍या शौर्याचा आणि मुत्सद्देगिरीचा कालातीत दाखला आहे.

PM Modi interacts with the Indian community in Paris

July 13th, 11:05 pm

PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.

नवी दिल्लीत कर्तव्यपथच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 08th, 10:41 pm

आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. सर्व देशवासीय यावेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. या ऐतिहासिक क्षणी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप पुरी जी, श्री जी किशन रेड्डी जी, श्री अर्जुनराम मेघवाल जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, श्री कौशल किशोर जी आज माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. देशातील अनेक मान्यवरही आज येथे उपस्थित आहेत.

PM inaugurates 'Kartavya Path' and unveils the statue of Netaji Subhas Chandra Bose at India Gate

September 08th, 07:00 pm

PM Modi inaugurated Kartavya Path and unveiled the statue of Netaji Subhas Chandra Bose. Kingsway i.e. Rajpath, the symbol of colonialism, has become a matter of history from today and has been erased forever. Today a new history has been created in the form of Kartavya Path, he said.