'मन की बात'च्या बाबतीत लोकांनी जे प्रेम दाखवले ते अभूतपूर्व: पंतप्रधान मोदी
May 28th, 11:30 am
‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मराठी अनुवाद
May 24th, 06:41 am
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे जे आदरातिथ्य झाले त्याबद्दल आणि आम्हाला मिळालेल्या आदराबद्दल मी ऑस्ट्रेलियातील जनतेचे आणि पंतप्रधान अल्बानीज यांचे मनापासून आभार मानतो. माझे मित्र पंतप्रधान अल्बानीज भारत भेटीवर येऊन गेल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच मी ऑस्ट्रेलियाला आलो आहे.गेल्या एका वर्षातली आमची ही सहावी भेट आहे.Prime Minister’s visit to the Hiroshima Peace Memorial Museum
May 21st, 07:58 am
Prime Minister Shri Narendra Modi joined other leaders at G-7 Summit in Hiroshima to visit the Peace Memorial Museum. Prime Minister signed the visitor’s book in the Museum. The leaders also paid floral tributes at the Cenotaph for the victims of the Atomic Bomb.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट
May 20th, 07:57 pm
पंतप्रधानांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा येथे G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली.क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांचे प्रारंभिक वक्तव्य
May 20th, 05:16 pm
प्रधानमंत्री एल्बनीसी , प्रधानमंत्री किशिदा , आणि राष्ट्राध्यक्ष बायडन ,क्वाड राष्ट्रसमुह प्रमुखांच्या परिषदेत पंतप्रधानांनी घेतला सहभाग
May 20th, 05:15 pm
जपानमधील हिरोशिमा इथे 20 मे 2023 रोजी झालेल्या तिसऱ्या क्वाड लीडर्स समिटमध्ये (क्वाड राष्ट्रसमूह प्रमुखांची परिषद), पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बिडेन यांच्यासमवेत प्रत्यक्ष सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉ यांच्यात द्विपक्षीय बैठक
May 20th, 05:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा येथे G-7 परिषदे दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉ यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.पंतप्रधानांनी साधला जपानी मान्यवरांसोबत संवाद
May 20th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर परिषदेसाठीच्या हिरोशिमा भेटीदरम्यान जपानी मान्यवर टोमियो मिझोकामी आणि हिरोको ताकायामा यांची भेट घेतली. या मान्यवरांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे केले अनावरण
May 20th, 08:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले.PM Modi arrives in Hiroshima, Japan
May 19th, 05:23 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Hiroshima, Japan. He will attend the G7 Summit as well hold bilateral meetings with PM Kishida of Japan and other world leaders.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानच्या पंतप्रधानांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसाठी निवेदन
March 20th, 12:30 pm
सर्वात प्रथम मी पंतप्रधान कीशिदा आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या वर्षभरात पंतप्रधान कीशिदा आणि माझी अनेकदा भेट झाली आहे. प्रत्येक भेटीत भारत जपान संबंधाबाबत त्यांची सकारात्मकता आणि कटिबद्धता मला जाणवली आहे त्यामुळेच आज त्यांची भेट आमच्या सहकार्याचा वेग कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.PM pays homage to all those who lost their lives in Hiroshima bombings, during the World War-II
August 06th, 10:37 am