पंतप्रधान 24 मार्च रोजी वाराणसी दौऱ्यावर

March 22nd, 04:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मार्च रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.

आज बिहारमध्ये पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 13th, 12:01 pm

कार्यक्रमाच्या प्रारंभीच मला आपल्याबरोबर एक दुःखद बातमी सामायिक करायची आहे. बिहारचे दिग्गज नेते रघुवंश प्रसाद सिंह आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांना मी वंदन करतो. रघुवंशबाबू यांच्या जाण्याने बिहार आणि देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. अगदी तळागाळातल्या समाजाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व, गरीबी म्हणजे नेमके काय हे समजणारे व्यक्त्वि, त्यांनी संपूर्ण जीवन बिहारसाठी संघर्ष करण्यामध्ये घालवले. ज्या विचारधारेमध्ये ते वाढले- मोठे झाले, जीवनभर त्याच तत्वांनुसार जगाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पंतप्रधानांनी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला केले समर्पित

September 13th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका हा भाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्लांटचा समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन ऑइल आणि एचपीसीएल, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी हे प्रकल्प उभारले आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ

October 22nd, 05:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथे एका जनसभेत वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित केली.

पंतप्रधान गुजरातला भेट देणार, घोघा आणि दहेज दरम्यान रोरो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २२ ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत.

October 21st, 06:17 pm

घोघा येथे एका सभेत पंतप्रधान घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करतील.