राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला अभिमान
August 11th, 11:07 am
तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान व्यक्त केला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाने भारत आणि तिमोर लेस्ते या देशांमधील खोलवर रुजलेले बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर अधोरेखित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे केले अभिनंदन
August 06th, 05:29 pm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आला.भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
July 09th, 09:54 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून 22व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी दिलेल्या निमंत्रणावरून 8-9 जुलै 2024 रोजी रशियन महासंघाला अधिकृत भेट दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
July 09th, 08:12 pm
भारत-रशिया संबंध बळकट करण्यासाठीच्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रेमलिनमधील सेंट अँड्र्यू हॉलमध्ये एका विशेष समारंभात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल प्रदान केला. 2019 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्समध्ये ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
July 13th, 11:56 pm
फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेच्या वतीने फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांचे आभार मानले. पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
May 22nd, 12:14 pm
अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
December 17th, 08:42 pm
भूतानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भूतानचे राजे महामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो ' या त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. मोदी यांनी या पुरस्काराबद्दल भूतानचे महामहिम राजे यांचे आभार मानले आहेत.