अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
April 18th, 04:34 pm
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅक्मास्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लेफ्टनंट जनरल मॅक्मास्टर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुभेच्छा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दूरध्वनीवरुन झालेल्या संभाषणाबद्दल पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या संभाषणात महत्वपूर्ण भागीदारीला दोन्ही देश देत असलेले महत्त्व तसेच भारत-अमेरिका यांच्यातील सर्व क्षेत्रातील सहकार्य या मुद्याचा पुनरुच्चार झाला होता.