अफगाणिस्तानच्या राजदूतांना भारतीय डॉक्टरच्या आलेल्या अनुभवाविषयी पंतप्रधानांनी केले ट्वीट
July 01st, 05:17 pm
अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुन्दजई यांनी आज डॉक्टर्स दिनानिमित्त केलेल्या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. या राजदूतांनी, भारतीय डॉक्टरसोबतचा आपला एक भावनिक अनुभव संगीतला आहे. मामुन्दजई एका डॉक्टरकडे उपचारांसाठी गेले होते, त्यावेळी, जेव्हा ते अफगाणिस्तानचे राजदूत असल्याचे डॉक्टरांना कळले, तेव्हा त्या डॉक्टरांनी ‘मी माझ्या बंधूकडून कसलेही पैसे घेणार नाही’ असे सांगत कोणतेही शुल्क आकारले नव्हते. विशेष म्हणजे मामुन्दजई यांनी हे ट्वीट हिंदीत केले आहे. राजदूतांनी सांगितलेल्या या अनुभवातून, भारत-अफगाणिस्तान सबंधांमधील स्नेहाचा दरवळ जाणवतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे.उद्या हरिपुरा येथे आयोजित कार्यक्रम आपल्या देशासाठी नेताजी बोस यांनी दिलेल्या योगदानाला अभिवादन ठरेल: पंतप्रधान
January 22nd, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना आदरांजली वाहिली आहे.