पोलंड आणि युक्रेन या देशांच्या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
August 21st, 09:07 am
भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्या नात्याला अधिक बळ देते. आपली भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मी माझे मित्र पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्या सोबतच्या बैठकींबाबत मी उत्सुक आहे. या दौऱ्यात मी पोलंडमधील उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डूडा यांच्यात दूरध्वनी संवाद
March 01st, 10:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.