हरियाणातील रेवाडी येथे विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 16th, 01:50 pm
शूरवीरांची भूमी असलेल्या रेवाडीमधून संपूर्ण हरियाणातील जनतेला माझा नमस्कार! मी जेव्हा जेव्हा रेवाडीला येतो तेव्हा अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. रेवाडीशी माझे काही वेगळेच नाते आहे. मला माहित आहे रेवाडीतील लोकांचा मोदींवर खूप जास्त लोभ आहे. आणि आता, माझे स्नेही राव इंद्रजीत जी यांनी सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्री मनोहर लाल जी यांनी सांगितल्याप्रमाणे, 2013 मध्ये, भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते, तेव्हा माझा पहिला कार्यक्रम रेवाडीमध्ये झाला होता आणि त्या वेळी रेवाडीने मला 272 पार करण्याचा आशीर्वाद दिला होता आणि तुमचा तो आशीर्वाद फळला. आता लोक म्हणत आहेत की, मी पुन्हा एकदा रेवाडीत आलो आहे, तर तुमचा आशीर्वाद आहे, यावेळी 400 पार, एनडीए सरकार 400 हून अधिक जागा मिळवेल.पंतप्रधानांनी हरियाणातील रेवाडी येथे 9,750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी
February 16th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील रेवाडी येथे 9750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. शहरी वाहतूक, आरोग्य, रेल्वे आणि पर्यटन यासंबंधी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील हे प्रकल्प आहेत. इथल्या प्रदर्शनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.पंतप्रधान एम्स रेवाडीची बसवणार कोनशिला
February 15th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी हरयाणामधील रेवाडीला भेट देणार आहेत. दुपारी एक वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पंतप्रधान, 9750 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या शहरी वाहतूक, आरोग्य, रेल्वे आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. 5450 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात येणार असलेल्या गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कोनशिला देखील ते बसवतील. हा प्रकल्प 28.5 किमी लांबीचा असून मिलेनियम सिटी सेंटर ते उद्योग विहार फेज-5 यांना जोडेल आणि सध्या अस्तित्वात असलेल्या रॅपिड मेट्रो रेल गुरुग्रामच्या मेट्रो जाळ्यात सायबर सिटीजवळ मौलसारी ऍव्हेन्यू स्टेशन येथे विलिन होईल.