आघाडीवर असलेल्या कोविड योध्द्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य देत भारत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे : पंतप्रधान
January 16th, 03:22 pm
कोरोनाविरूध्दच्या लढाईदरम्यान देशाने संपूर्णपणे दर्शविलेल्या नि:स्वार्थी भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. कोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करताना मोदी म्हणाले, गेल्या वर्षाने भारतीयांना एक व्यक्ती, एक कुटुंब, एक देश म्हणून खूप काही शिकवले आणि सहन करायला लावले. तेलगु कवी गुराजडा वेंकटा अप्पाराव यांची एक ओळ उधृत करत मोदी म्हणाले आपण सर्वांनी नेहमी इतरांसाठी नि:स्वार्थीपणे कार्य केले पाहिजे, राष्ट्र म्हणजे केवळ माती, पाणी आणि दगड नव्हे तर, राष्ट्र म्हणजे 'आपण सर्वजण' आणि कोरोना विरुद्धचा लढा याच भावनेतून दिला गेला, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.