भारताचे नवीन पुन्हा वापरण्याजोगे कमी खर्चाचे उपग्रह प्रक्षेपण वाहन

September 18th, 04:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV), अर्थात पुढल्या पिढीतील प्रक्षेपण वाहनाच्या विकासाला मंजुरी दिली आहे. भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना आणि परिचालन करण्याच्या आणि 2040 साला पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय अंतराळ वीरांचा समावेश असलेले यान उतरवण्याची क्षमता विकसित करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाउल ठरेल.

जीएसएलव्ही - MKIII D1/GSAT-19 मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन

June 05th, 06:41 pm

“जीएसएलव्ही - MKIII D1/GSAT-19 या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या सर्व समर्पित वैज्ञानिकांचे अभिनंदन. पुढच्या पिढीतील प्रक्षेपक वाहने आणि उपग्रह क्षमता प्राप्त करण्याच्या दृष्टीने या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आगेकूच सुरु ठेवली आहे. देशाला याचा अभिमान वाटतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अंतराळांत सहकार्य !

May 05th, 11:00 pm

5 मे 2017 हा दिवस दक्षिण आशिया सहकार्याला मोठी चालना मिळाल्याचा दिवस आहे. याच दिवशी दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत सोडून; 2 वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यांत आले.

दक्षिण आशिया उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केल्याबद्दल दक्षिण आशियातल्या नेत्यांनी भारताची पाठ थोपटली

May 05th, 06:59 pm

दक्षिण आशिया उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केल्याबद्दल दक्षिण आशियातल्या नेत्यांनी भारताची पाठ थोपटली आणि ‘सबका साथ सबका विकास’ ह्या संकल्पनेप्रती भारताच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली.

दक्षिण आशिया उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर दक्षिण आशियाई देशांच्या प्रमुखांबरोबर व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले समारोपाचे भाषण

May 05th, 06:38 pm

PM Narendra Modi congratulated the South Asian leaders on successful launch of South Asia Satellite. The PM said, Sabka Sath, Sabka Vikas can be the guiding light for action and cooperation in South Asia.

अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल: दक्षिण आशिया उपग्रहाच्या उड्डाणाच्या वेळी पंतप्रधान

May 05th, 04:02 pm

दक्षिण आशिया उपग्रहाचे उड्डाण ऐतिहासिक असल्याचे सांगून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल. ह्या उपग्रहामुळे दुर्गम प्रदेशांत प्रभावी संपर्क, चांगले प्रशासन, सुधारित बँकिंग सेवा आणि चांगले शिक्षण पुरविण्यास मदत होईल असं ते म्हणाले. दक्षिण आशियातल्या देशांच्या नेत्यांना धन्यवाद देऊन पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही सर्व एकत्र येणे हे आमच्या लोकांच्या गरजा सर्वांच्या समोर मांडण्याचा आमचा दृढ निश्चय दर्शविते.”