Green Hydrogen Fuel Cell Bus is a part of our efforts to boost sustainability, contribute to a greener future: PM
October 21st, 08:08 pm
Expressing delight on Bhutanese PM Tshering Tobgay’s ride on Green Hydrogen Fuel Cell Bus, the Prime Minister Shri Narendra Modi today remarked that Green Hydrogen Fuel Cell Bus was part of India’s efforts to boost sustainability and contribute to a greener future for the coming generations.ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे सेमीकॉन इंडिया 2024 कार्यक्रमात झालेले पंतप्रधानांचे भाषण
September 11th, 12:00 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री-योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी-अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद, जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित सर्व दिग्गज, शिक्षण-संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्व भागीदार, इतर मान्यवर पाहुणे, स्त्री-पुरुष आणि सज्जनहो, सर्वांना नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन
September 11th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजित या तीन दिवसीय परिषदेत भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित केले जाणार आहे ज्यामध्ये भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताच्या भविष्यासाठी मांडला महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन
August 15th, 10:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात, भारताच्या विकासाला आकार देणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने भविष्यकालीन उद्दिष्टांची मालिका रेखाटली.हरिद्वारच्या शेतकऱ्याने मत्स्य संपदेच्या माध्यमातून आपले उत्पन्न दुप्पट करून पंतप्रधानांना केले प्रभावित
December 27th, 02:34 pm
विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही सहभागी झाले होते.‘हरित विकास’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन
February 23rd, 10:22 am
भारतात 2014 नंतर जेवढे अर्थसंकल्प सादर केले गेले त्या प्रत्येक अर्थसंकल्पात एक विशिष्ट असा प्रकार आढळतो. हा प्रकार असा आहे की आमच्या सरकारचा प्रत्येक अर्थसंकल्प, विद्यमान आव्हानांवर उपाययोजना करण्यासोबतच नव्या युगातील सुधारणांना वाव देत आला आहे. हरित विकास आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारताच्या धोरणाच्या डोलाऱ्याचे तीन प्रमुख खांब आहेत. पहिला खांब आहे नवीकरणीय म्हणजेच अपारंपरिक ऊर्जेचं उत्पादन वाढवणं. दुसरा खांब आहे आपल्या अर्थव्यवस्थेमधील जीवाश्म इंधनाचा उपयोग कमी करणं. आणि तिसरा खांब आहे वायु इंधनावर आधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने आगेकूच करणं, थोडक्यात वायु इंधनाचा जास्तीत जास्त उपयोग करणं. याच धोरणा अंतर्गत, मग ते इथेनॉल मिश्रण असो, पीएम कुसुम योजना असो, सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देणं असो, घरांच्या छतावर सौर ऊर्जेची तबकडी बसवण्याची योजना असो, कोळशापासून वायूनिर्मिती असो, बॅटरी संचय असो, गेल्या काही वर्षातील अर्थसंकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सुद्धा उद्योगांसाठी हरित कर्जाची तरतूद आहे, तर शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जमिनीचा कस टिकवण्यावर भर देणारी पीएम प्रमाण'हरित विकास' या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 23rd, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरित ऊर्जा या विषयावर आधारित अर्थसंकल्प-पश्चात वेबिनारला संबोधित केले. 2023 च्या अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सर्व संबंधितांच्या कल्पना आणि सल्ले जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प-पश्चात 12 वेबिनारच्या मालिकेतील हे पहिलेच वेबिनार होते.केंद्रीय अर्थसंकल्प 2023 वरील पंतप्रधानांचे विवेचन
February 01st, 02:01 pm
अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा भव्य संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मजबूत पाया तयार करेल. हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देतो. हा अर्थसंकल्प आजचा आकांक्षित समाज- गाव-गरीब, शेतकरी, मधम वर्ग, सर्वांची स्वप्न पूर्ण करेल.वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प : पंतप्रधान
February 01st, 02:00 pm
अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प, विकसित भारताच्या आकांक्षा आणि निर्धार यांच्या पूर्ततेचा भक्कम पाया घालत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून आकांक्षी समाज,गरीब आणि मध्यम वर्गांच्या स्वप्नांची पूर्तता करेल असे पंतप्रधान म्हणाले.India of 21st century is moving ahead with full confidence in its youth: PM
August 25th, 08:01 pm
PM Modi addressed the Grand Finale of Smart India Hackathon 2022. Reiterating his Independence Day proclamation about the aspirational society, the PM said that this aspirational society will work as a driving force in the coming 25 years. Aspirations, dreams and challenges of this society will bring forth many opportunities for the innovators, he added.पंतप्रधानांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या समारोप कार्यक्रमाला केले संबोधित
August 25th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 540 मेगावॅट क्वार जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
April 27th, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित, मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत, चिनाब नदीवर 540 मेगावॅटचा क्वार जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड़ जिल्हयात, हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी 4526.12 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीलाही मंजूरी देण्यात आली आहे. मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (M/s. CVPPL) ही कंपनी हा प्रकल्प उभारेल. ही कंपनी एनएचपीसी आणि जेकेएसपीडीसी यांच्या संयुक्त भागीदारीतली असून, त्यात त्यांची अनुक्रमे 51 आणि 49 टक्के भागीदारी आहे.कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मृती भवनात बिप्लवी भारत कलादालनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 23rd, 06:05 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ जी, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डी जी, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलशी संबंधित सर्व मान्यवर, विद्यापीठांचे कुलगुरू, कला आणि सांस्कृतिक विश्वातील दिग्गज, स्त्री आणि पुरुषहो,शहीद दिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथील विक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे उद्घाटन
March 23rd, 06:00 pm
शहीद दिवसाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पश्चिम बंगालच्या कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.द एनर्जी अँड रिसोर्सेस (TERI’s) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
February 16th, 06:33 pm
एकविसाव्या जागतिक शाश्वत विकास परिषदेमध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे.माझ्या 20 वर्षांच्या कार्यकाळात, प्रथम गुजरातमध्ये आणि आता राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण आणि शाश्वत विकास हे माझ्यासाठी मुख्य केंद्रीत क्षेत्र आहेत.टेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
February 16th, 06:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या (TERI) जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत व्हिडीओ संदेशाद्वारे उद्घाटनपर सत्राला संबोधित केले. डोमिनिकन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष लुई अबिनादेर, गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली, संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमिना जे मोहम्मद, आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संयुक्तपणे केले मॉरिशसमधील सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन तसेच नागरी सेवा महाविद्यालय आणि 8 मेगावॉटचा सौर ऊर्जा फोटो वोल्टाइक प्रकल्प यासाठी केले भूमिपूजन
January 20th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी आज संयुक्तपणे मॉरिशसमधील सामाजिक गृहनिर्माण एकक प्रकल्पाचे उद्घाटन केले. भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या गतिमान विकासात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यावेळी, उभय देशांच्या पंतप्रधानांनी आणखी दोन प्रकल्पांसाठीच्या भूमिपूजन समारंभातही आभासी माध्यमातून भाग घेतला. यामध्ये एका अद्ययावत अशा नागरी सेवा महाविद्यालयाचा आणि 8 मेगावॉटच्या सौर ऊर्जा फोटो वोल्टाइक प्रकल्पाचा समावेश आहे. मॉरिशसच्या विकासासाठी भारताकडून मिळणाऱ्या पाठबळातून हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. मॉरिशसमध्ये त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाच्या परिसरात त्यांचे काही कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.मॉरिशसमधील विकास प्रकल्पांच्या संयुक्त उद्घाटन आणि प्रारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 20th, 04:49 pm
सर्व 130 कोटी भारतवासीयांच्या वतीने मॉरिशसच्या सर्व बंधुभगिनींना नमस्कार, बॉन्झो (फ्रेंच भाषेतून नमस्ते) आणि थाइपूसम कावडीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !राज्यांतर्गत पारेषण व्यवस्था- हरित ऊर्जा मार्गिका टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
January 06th, 07:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयांशी संबंधित मंत्रिमंडळ समितिच्या आज झालेल्या बैठकीत, हरित ऊर्जा मार्गिका- टप्पा दोन ला मंजूरी देण्यात आली. राज्यांतर्गत पारेषण व्यवस्थेसाठी ही योजना राबवली जाणार असून त्याअंतर्गत, सुमारे 10,750 सर्किट किलोमीटर्स पारेषण लाईन्स आणि वीज उपकेंद्रांमध्ये सुमारे 27,500 मेगा वोल्ट-अॅम्पियर (MVA) वीज इतकी क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे.गुजरात इथे झालेल्या नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 16th, 04:25 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गृह आणि सहकार मंत्री अमित भाई शाह, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर जी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, इतर सर्व मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने जोडले गेलेले माझे शेतकरी बंधू भगिनी, देशाच्या कृषी क्षेत्रासाठी, शेती आणि शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे.