महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 20th, 11:45 am
दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित
September 20th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या भाषणाचा मजकूर
January 18th, 12:47 pm
विकासित भारत संकल्प यात्रेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रवासात धावणारा विकासाचा रथ हा श्रद्धेचा रथ असून आता लोक त्याला हमीचा रथ देखील म्हणू लागले आहेत. योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, कुणीही लाभ मिळाल्या वाचून राहणार नाही, असा विश्वास आता निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये मोदींच्या हमीची गाडी अद्याप पोहोचलेली नाही, तिथे तिची आता अगदी आतुरतेने प्रतिक्षा होत आहे. आणि म्हणूनच आम्ही यापूर्वी 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरु ठेवण्याचा विचार केला होता, परंतु आम्हाला एवढा पाठिंबा मिळाला, एवढी मागणी वाढली, प्रत्येक गावातील लोक सांगत आहेत की मोदींची हमी असलेले वाहन आमच्या ठिकाणी यावे. तेव्हा मला हे कळल्यावर मी आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले की 26 जानेवारीपर्यंतच नाही तर आणखी थोडी मुदतवाढ द्या. लोकांना गरज आहे, लोकांची मागणी आहे तर ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. आणि त्यामुळे कदाचित काही दिवसांनी हे ही निश्चित होईल की मोदींची हमीची गाडी कदाचित फेब्रुवारी महिन्यातही चालवली जाईल.विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 18th, 12:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सामील झाले. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 09th, 12:35 pm
मोदींची हमी देणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक गावात जो उत्साह दिसतो आहे तो भारताच्या कानाकोपऱ्यात दिसतो आहे. मग ते उत्तर असो, दक्षिण असो, पूर्व असो, पश्चिम असो किंवा अगदी लहान गाव किंवा मोठे गाव असो आणि काही गोष्टी समजल्यानंतर मी पाहिले आहे की, या वाहनाचा मार्ग जरी नसला तरीही लोक येऊन गावाच्या रस्त्यावर वाहन उभे करतात आणि सर्व माहिती घेतात, हे विलक्षण आहे. आणि मी काही लाभार्थींशी संवाद साधला आहे मला सांगण्यात आले की, या यात्रे दरम्यान 1.5 लाखाहून अधिक लाभार्थींना त्यांचे अनुभव कथन करण्याची संधी मिळाली आणि हे अनुभव नोंदवलेही गेले आहेत. आणि गेल्या 10-15 दिवसात गावातील लोकांच्या भावना काय आहेत, योजनांचे लाभ मिळाले आहेत का, त्यांची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे की नाही हे मी वेळोवेळी पाहिले आहे. त्यांना सर्व तपशील माहीत आहेत. जेव्हा मी तुमच्या चित्रफिती पाहतो, तेव्हा माझ्या गावातील लोक त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करतात हे पाहून मला खूप आनंद होतो.आता बघा कुणाला कायमस्वरूपी घर मिळाले तर त्याला असे वाटते की आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. एखाद्याला नळाद्वारे पाणी मिळाले तर त्याला वाटते की आजपर्यंत आपण पाण्यासाठी त्रासात जगत होतो, आज आपल्या घरात पाणी पोहोचले आहे.एखाद्याला शौचालय मिळाले तर त्याला इज्जत घर मिळाले असे वाटते.आणि जुन्या काळी केवळ प्रथितयश लोकांच्या घरात शौचालय असायचे, आता आमच्या घरात शौचालय आहे. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.आता तर आपल्या घरात शौचालये असतात. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.कुणाला मोफत उपचार मिळाले आहेत, कुणाला मोफत रेशन मिळाले आहे, कुणाला गॅस जोडणी मिळाली आहे, कुणाला वीज जोडणी मिळाली आहे, कुणी बँक खाते उघडले आहे, कुणाला पीएम किसान सन्मान निधी,कुणाला पीएम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे, काहींना पीएम स्वानिधी योजनेद्वारे मदत मिळाली आहे, काहींना पीएम स्वामित्व योजनेद्वारे मालमत्ता कार्ड मिळाले आहेत, म्हणजे मी योजनांची नावे सांगितली तर, मी पाहत होतो, भारताच्या कानाकोपऱ्यात गोष्टी पोहोचल्या आहेत. देशभरातील खेड्यापाड्यातील कोट्यवधी कुटुंबांना आपल्या सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा नक्कीच फायदा झाला आहे. आणि जेव्हा हा लाभ मिळतो तेव्हा एखाद्याचा विश्वास वाढतो. आणि जेव्हा या विश्वासाने जेव्हा छोटासा लाभ जरी मिमिळाला तरी जीवन जगण्यासाठी एक नवे बळ मिळते. आणि त्यासाठी त्यांना वारंवार कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. भीक मागण्याची जी मनःस्थिती असायची ती आता गेली आहे. सरकारने लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली आणि नंतर त्यांना लाभ देण्यासाठी पावले उचलली. म्हणूनच आज लोक म्हणतात मोदींची हमी म्हणजे हमी, पूर्णत्वाची हमी.पंतप्रधानांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थींशी साधला संवाद
December 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहचेल हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु करण्यात आली आहे.विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 30th, 12:00 pm
या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या विविध राज्यांचे राज्यपाल, या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, संसद सदस्य तसेच आमदार आणि गावागावांतून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे प्रिय बंधू-भगिनींनो, मातांनो, माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
November 30th, 11:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले.देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी सुरू केला. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. या आश्वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष आजचा हा कार्यक्रम आहे. . झारखंडमधील देवघर, ओदीशातील रायगढ़, आंध्र प्रदेशातील प्रकाशम, अरुणाचल प्रदेशातील नामसाई आणि जम्मू-काश्मीरमधील अरनिया येथील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग
September 24th, 11:30 am
‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.During Congress rule, nothing was done to empower Panchayati Raj institutions: PM Modi
August 07th, 10:37 pm
Today, PM Modi addressed the Kshetriya Panchayati Raj Parishad in Haryana via video conferencing. Addressing the gathering, the PM said, “Today, the country is moving forward with full enthusiasm to fulfill the resolutions of Amrit Kaal and to build a developed India. The PM said, District Panchayats hold tremendous potential to drive significant transformations in various sectors. In this context, your role as representatives of the BJP becomes exceptionally vital.PM Modi addresses at Kshetriya Panchayati Raj Parishad in Haryana
August 07th, 10:30 am
Today, PM Modi addressed the Kshetriya Panchayati Raj Parishad in Haryana via video conferencing. Addressing the gathering, the PM said, “Today, the country is moving forward with full enthusiasm to fulfill the resolutions of Amrit Kaal and to build a developed India. The PM said, District Panchayats hold tremendous potential to drive significant transformations in various sectors. In this context, your role as representatives of the BJP becomes exceptionally vital.Centre's projects is benefitting Telangana's industry, tourism, youth: PM Modi
July 08th, 12:52 pm
Addressing a rally in Warangal, PM Modi emphasized the significant role of the state in the growth of the BJP. PM Modi emphasized the remarkable progress India has made in the past nine years, and said “Telangana, too, has reaped the benefits of this development. The state has witnessed a surge in investments, surpassing previous levels, which has resulted in numerous employment opportunities for the youth of Telangana.”PM Modi addresses a public meeting in Telangana’s Warangal
July 08th, 12:05 pm
Addressing a rally in Warangal, PM Modi emphasized the significant role of the state in the growth of the BJP. PM Modi emphasized the remarkable progress India has made in the past nine years, and said “Telangana, too, has reaped the benefits of this development. The state has witnessed a surge in investments, surpassing previous levels, which has resulted in numerous employment opportunities for the youth of Telangana.”वारंगल, तेलंगणा येथे विविध पायाभूत सेवा सुविधा विकास प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगीचे पंतप्रधानांचे भाषण
July 08th, 12:00 pm
तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सौंदराजन जी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी नितीन गडकरी जी, जी किशन रेड्डी जी, संजय जी, इतर मान्यवर आणि माझ्या तेलंगणातील बंधू-भगिनींनो, नुकतीच तेलंगणच्या स्थापनेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. तेलंगण राज्य हे नवीन असेल पण भारताच्या इतिहासात तेलंगणाचे योगदान, तेथील लोकांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. तेलगू भाषकांच्या बळाने भारताचे सामर्थ्य नेहमीच वाढवले आहे. म्हणूनच आज भारत जगातील पाचवी मोठी आर्थिक शक्ती बनला असताना, त्यातही तेलंगणातील लोकांचा मोठा वाटा आहे. आणि अशा परिस्थितीत, आज संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असताना, त्यासाठी पुढे येत असताना, विकसित भारताबद्दल एवढा उत्साह औत्सुक्य असताना, तेलंगणासमोरही अमाप संधी आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारंगळ येथे 6,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत सेवा सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी
July 08th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणा मध्ये वारंगळ येथे 6,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध महत्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या विकासकामांमध्ये 5500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 176 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि काझीपेठ येथे 500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे उत्पादन केंद्राच्या उभारणीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी भद्रकाली मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त मध्य प्रदेशात रिवा येथे पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 24th, 11:46 am
रीवाच्या या ऐतिहासिक भूमीतून मी माँ विंध्यवासिनीला नमन करतो. ही भूमी शूरवीरांची आहे, देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्याचंची आहे. मी रीवा येथे अगणित वेळा आलो आहे, मी तुमच्यामध्ये आलो आहे. आणि तुमचे उदंड प्रेम आणि आपुलकी मला नेहमीच मिळत आली आहे. आजही तुम्ही सर्वजण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आला आहात. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांना, देशातील अडीच लाखाहून अधिक पंचायतींना, राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुमच्यासोबत 30 लाखांहून अधिक पंचायत प्रतिनिधीही दूरदृश्य माध्यमातून आपल्याशी जोडले गेले आहेत. भारताच्या लोकशाहीचे हे निश्चितच फार सशक्त चित्र आहे. आम्ही सर्व जनतेचे प्रतिनिधी आहोत. आपण सर्व या देशाला, या लोकशाहीला समर्पित आहोत. कामाची व्याप्ती वेगळी असू शकते, पण ध्येय एकच आहे - राष्ट्रसेवा.मध्य प्रदेशातील रिवा येथे आयोजित राष्ट्रीय पंचायती राज दिन सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 24th, 11:45 am
मध्य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. सुमारे 17,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण त्यांनी केले.पंतप्रधान 24 मार्च रोजी वाराणसी दौऱ्यावर
March 22nd, 04:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मार्च रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी 4800 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” या केंद्र पुरस्कृत योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
February 15th, 03:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी 4800 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” या केंद्र पुरस्कृत योजनेला मंजुरी दिली आहे.देशातील सहकार चळवळ बळकट करून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
February 15th, 03:49 pm
देशातील सहकार चळवळीला बळकटी देऊन ती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून ‘संपूर्ण-सरकार’ दृष्टिकोनाचा लाभ घेत, प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्यवहार्य प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध सहकारी संस्था नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत/गावात व्यवहार्य दुग्ध सहकारी संस्था आणि प्रत्येक समुद्रकिनाऱ्यांलगतच्या पंचायत/गावात व्यवहार्य मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी तसेच मोठे जलस्रोत असलेल्या ग्रामपंचायत/गावात आणि विद्यमान प्राथमिक कृषी पतसंस्था/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी योजना तयार केली आहे. सुरुवातीला, पुढील पाच वर्षांत 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था / दुग्धव्यवसाय/ मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन केल्या जातील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नाबार्ड, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (एनएफडीबी) च्या माध्यमातून कृती आराखडा तयार केला जाईल.