भारतीय अन्न महामंडळात 2024 -25 आर्थिक वर्षात 10,700 कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

November 06th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक समितीने भारतीय अन्न महामंडळाला (FCI) खेळते भांडवल उपलब्ध होण्‍यासाठी 2024 - 25 या आर्थिक वर्षात 10,700 कोटी रुपये इतक्या समभाग गुंतवणूकीला मान्यता दिली आहे.कृषी क्षेत्राला चालना देता यावी तसेच देशभरातील शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करता यावे, या उद्देशाने मंत्रिमडळाने या निर्णयाला मान्यता दिली.केंद्र सरकार सरकारने उचललेल्या या धोरणात्मक पावलामुळे,सरकार शेतकऱ्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने तसेच भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारची वचनबद्धता दृढ असल्याचे दिसून येते.

आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 03rd, 09:35 am

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन

August 03rd, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या (एनएएससी) संकुलात आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन केले. 'शाश्वत कृषी-अन्न व्यवस्थेच्या दिशेने परिवर्तन' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि उद्भवणारे विविध संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करत, नितांत गरजेची झालेली शाश्वत कृषी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे या संकल्पनेत अ़तर्गतचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 75 देशांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

आज अंबाला येथील आकाशात राफेल विमाने उडताना पाहणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे: पंतप्रधान मोदी अंबाला येथे

May 18th, 03:00 pm

अंबाला येथील रॅलीला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे हेतू फसवे असल्याचे अधोरेखित करत हरियाणाच्या विकासासाठी भाजप वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. मोदींच्या 'धाकड' सरकारने कलम 370 चा अडसर दूर केल्याने काश्मीर विकासाच्या मार्गावर चालत आहे, असे ते सभेला संबोधित करताना म्हणाले

हरियाणातील अंबाला आणि सोनीपत येथील सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे उत्साही जनसमुदायासमोर भाषण

May 18th, 02:46 pm

अंबाला आणि सोनीपत येथील प्रचंड सभांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे हेतू फसवे असल्याचे अधोरेखित करत हरियाणाच्या विकासासाठी भाजपच्या वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. मोदींच्या 'धाकड' सरकारने कलम 370 चा अडसर दूर केला असल्याने काश्मीर विकासाच्या मार्गावरून चालू लागला आहे, असे ते सभेला संबोधित करताना म्हणाले.

सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार

February 22nd, 04:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.