कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
December 12th, 05:20 pm
आणि यामुळेच या शिखर परिषदेची जोडल्या गेलेल्या प्रत्येक देशावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. मागच्या काही दिवसात मला अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांशी भेटण्याची संधी मिळाली मी त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा या शिखर परिषदेविषयी चर्चा केली आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ते च्या प्रभावाखालून सध्याच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्या असे कोणीच सुटू शकणार नाही. आपल्याला खूपच सतर्क राहून आणि खूपच सावधानता बाळगून वाटचाल करावी लागणार आहे.आणि यासाठी मी समजतो की या शिखर परिषदेतून पुढे येणारे विचार या परिषदेतून मिळणाऱ्या सूचना संपूर्ण मानव जातीसाठी जे मूलभूत मूल्य आहे त्याचे संरक्षण करणे आणि त्याला योग्य दिशा देण्याचे काम करेल.पंतप्रधानांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन
December 12th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन केले. पंतप्रधानांनी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रदर्शनाचाही आढावा घेतला. जीपीएआय हा 29 सदस्य देशांसह एक बहु-हितधारक उपक्रम आहे. एआय संबंधित प्राधान्यक्रमांवरील अत्याधुनिक संशोधन आणि उपयोजित उपक्रमांना समर्थन देऊन एआय वरील सिद्धांत आणि सराव यांच्यातील अंतर कमी करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. वर्ष 2024 मध्ये भारत ‘ जीपीएआय’चे अध्यक्षस्थान भूषवेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचं उद्घाटन
December 11th, 04:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी, संध्याकाळी पाच वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेकृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे.आगामी जागतिक भागीदारी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदे संदर्भात पंतप्रधानांनी आपले विचार लिंक्डइन वर पोस्ट केले आहेत
December 08th, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी जागतिक भागीदारी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (GPAI) परिषदे संदर्भात लिंक्डइन वर पोस्ट केली आहे.