राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 07th, 04:16 pm

काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

August 07th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.

2022-23 मध्ये सरकारी ई बाजारपेठेने रु. 2 लाख कोटींचे सकल व्यापार मूल्य ओलांडल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

March 31st, 05:35 pm

2022-23 मध्ये जीईएम अर्थात सरकारी ई बाजारपेठेने रु. 2 लाख कोटी मूल्याच्या वस्तूंच्या विक्रीचा टप्पा ओलांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जीईएम (GeM) मंचावर उत्पादने प्रदर्शित करणाऱ्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

November 29th, 09:56 pm

जीईएम (GeM) मंचावर उत्पादने प्रदर्शित करणाऱ्या विक्रेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्सच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 16th, 03:31 pm

75 डिजिटल बँकिंग युनिट्स म्हणजे विभागाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आज देश पुन्हा एकदा डिजिटल भारताच्या सामर्थ्याचा साक्षीदार होतो आहे. आज देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स कार्यान्वित होत आहेत. या मोहिमेशी संबंधित सर्व लोकांचे, आपल्या बँकिंग क्षेत्राचे, आपल्या रिझर्व्ह बँकेचे मी मनापासून अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्स केली देशाला समर्पित

October 16th, 10:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट(केंद्र) (डीबीयु) दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्राला समर्पित केली.

कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 17th, 01:03 pm

आज भारताच्या भूमीवर चित्ते परतले आहेत आणि मी तर हे देखील म्हणेन की या चित्त्यांबरोबरच भारताची निर्सगप्रेमाची भावना संपूर्ण ताकदीनिशी जागृत झाली आहे. मी या ऐतिहासिक क्षणी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत आहे.

PM addresses Women Self Help Groups Conference in Karahal, Madhya Pradesh

September 17th, 01:00 pm

PM Modi participated in Self Help Group Sammelan organised at Sheopur, Madhya Pradesh. The PM highlighted that in the last 8 years, the government has taken numerous steps to empower the Self Help Groups. “Today more than 8 crore sisters across the country are associated with this campaign. Our goal is that at least one sister from every rural family should join this campaign”, PM Modi remarked.

अहमदाबाद इथे खादी उत्सव मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

August 27th, 09:35 pm

चरख्याला स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाच्या हृदयात स्थान मिळाले होते, तीच स्पंदनं आज मी इथे साबरमतीच्या किनारी अनुभवत आहे. मला विश्वास आहे की इथे उपस्थित असलेले सर्व लोक, हा कार्यक्रम पाहत असलेले सर्व लोक, आज इथे होत असलेल्या खादी उत्सवामधलं चैतन्य सुद्धा अनुभवत असतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशानं आज खादी महोत्सव भरवून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना खूप सुंदर भेट दिली आहे. आजच गुजरात राज्याच्या खादी ग्रामोद्योग मंडळाची नवी इमारत आणि साबरमती नदीवर बांधलेल्या भव्य अशा अटल पुलाचं लोकार्पण सुद्धा झालं आहे. मी अहमदाबादच्या लोकांचं, गुजरातच्या लोकांचं, आज आपण एका नव्या टप्प्यावर पोहोचून आणखी पुढे प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो !!!

PM participates in Khadi Utsav at the Sabarmati River Front, Ahmedabad

August 27th, 05:51 pm

PM Modi addressed Khadi Utsav at the Sabarmati River Front, Ahmedabad. The PM recalled his personal connection with Charkha and remembered his childhood when his mother used to work on Charkha. He said, “The bank of Sabarmati has become blessed today as on the occasion of 75 years of independence as 7,500 sisters and daughters have created history by spinning yarn on a spinning wheel together.”

पंतप्रधान 4 जुलैला भीमावरम आणि गांधीनगरला भेट देणार

July 01st, 12:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जुलै 2022 रोजी आंध्रप्रदेशातील भीमावरम आणि गुजरातेतील गांधीनगर येथे भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी 4-30 वाजता पंतप्रधान गांधीनगर येथे डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन करतील.

Democracy is in DNA of every Indian: PM Modi

June 26th, 06:31 pm

PM Modi addressed and interacted with the Indian community in Munich. The PM highlighted India’s growth story and mentioned various initiatives undertaken by the government to achieve the country’s development agenda. He also lauded the contribution of diaspora in promoting India’s success story and acting as brand ambassadors of India’s success.

म्युनिक, जर्मनी येथे भारतीय समुदायाशी पंतप्रधानांनी साधला संवाद

June 26th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील म्युनिक येथील ऑडी डोम, येथे भारतीय समुदायाला संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. जर्मनीतील भारतीय समुदायाचे हजारो सदस्य या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.

Country's development is getting new momentum by the youth: PM

May 14th, 09:59 am

The Prime Minister, Shri Narendra Modi launched the Madhya Pradesh Startup Policy during the Madhya Pradesh Startup Conclave being held in Indore, today, via video conferencing. He also launched the Madhya Pradesh Startup portal, which will facilitate and help promote the startup ecosystem. He also interacted with the startup entrepreneurs.

मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधानांनी मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा केला प्रारंभ

May 13th, 06:07 pm

मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंदूर इथं मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. त्यांनी स्टार्टअप इकोसिस्टिम अर्थात परिसंस्थेला चालना देणाऱ्या आणि ती सुलभ करणाऱ्या मध्य प्रदेश स्टार्टअप पोर्टलचेही उद्घाटन केले. त्यांनी स्टार्टअप व्यावसायिकांशीही संवाद साधला.

जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या -जीतो कनेक्ट 2022 शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 06th, 02:08 pm

आपला भविष्यकालीन मार्ग आणि उद्दीष्ट दोन्ही स्पष्ट आहेत. आत्मनिर्भर भारत हाच आपला मार्ग आहे आणि हाच आपला संकल्पही आहे आणि हा काही फक्त कोणत्या सरकारचा नाही तर 130 कोटी देशवासियांचा आहे. गेल्या काही वर्षात आम्ही यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सातत्याने परिश्रम केले आहेत. देशात निर्माण होत असलेल्या योग्य वातावरणाचा उपयोग करून संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या माझ्या साथीदारांवर आहे JITO सदस्यांवर आहे. आपण जिथे कुठे जाल, ज्याला भेटाल त्याच्याशी आपल्या दिवसातील अर्धा वेळ येणाऱ्या दिवसांबद्दल चर्चा कराल अशा स्वभावाचे आपण आहात. गेलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यावर वेळ काढणारे लोक आपण नाही. भविष्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांपैकी आपण आहात आणि मी आपल्यासारख्यांमध्येच मोठा झालो आहे, त्यामुळे आपला स्वभाव काय आहे हे मला माहिती आहे.

जीतो कनेक्ट 2022 च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

May 06th, 10:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या 'जीतो कनेक्ट 2022' च्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

नागरी सेवा दिनानिमित्त सार्वजनिक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 21st, 10:56 pm

मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ.जितेंद्र सिंग, पी.के.मिश्राजी, राजीव गौबाजी, व्ही. श्रीनिवासनजी आणि आज येथे उपस्थित असलेले नागरी सेवेतील सर्व सदस्य तसेच देशभरातून आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व सहकारी, माननीय स्त्री-पुरुष, नागरी सेवा दिनानिमित्त तुम्हा सर्व कर्मयोग्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ज्या सहकाऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या संपूर्ण पथकाचे आणि त्या राज्याचे देखील माझ्याकडून अभिनंदन. मात्र माझी एक सवय थोडी विचित्र आहे, मी कोणाचेही मोफत अभिनंदन करत नाही. आपण काही गोष्टींना याच्याशी जोडून घेऊ शकतो का? अर्थात हे माझ्या मनात आलेले विचार आहेत पण तुम्ही मात्र ते असेच प्रत्यक्षात आणू नका, त्यांना तुमच्या प्रशासनिक यंत्रणेच्या चौकटीत बसवूनच अंमलात आणा.

पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार केले प्रदान

April 21st, 10:31 am

नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा उपस्थित होते.

पाणी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

March 27th, 11:00 am

गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.