बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर

September 26th, 12:15 pm

सर, भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती, म्हणजे मुलांचे 22 पैकी 21 गुण आणि मुलींचे 22 पैकी 19 गुण, एकूण 44 पैकी 40 इतके गुण आम्ही मिळवले. इतकं मोठं, अद्भूत प्रात्यक्षिक यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.

पंतप्रधान मोदींनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांची भेट घेऊन त्यांना दिले प्रोत्साहन

September 26th, 12:00 pm

पंतप्रधान मोदींनी दोन सुवर्णपदके जिंकण्याचे ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारताच्या बुद्धिबळ संघाशी संवाद साधला. या चर्चेत त्यांची मेहनत, बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता, AI चा या खेळावर होणारा परिणाम आणि यश मिळवण्याची जिद्द आणि संघभावनेचे महत्त्व या मुद्द्यांवर मुख्यत्वे भर होता.

45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक

September 23rd, 01:15 am

45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले. अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पुरुषांच्या आणि महिलांच्या असामान्य बुद्धिबळ संघांचे अभिनंदन केले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.

September 06th, 05:22 pm

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

September 05th, 07:59 am

सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ॲथलीट धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अंतिलचे केले अभिनंदन.

September 03rd, 12:01 am

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू सुमित अंतिलचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा बॅडमिंटनपटू नितेश कुमारचे केले अभिनंदन

September 02nd, 08:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नितेश कुमार याचे अभिनंदन केले.

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये आर2 महिला 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 30th, 04:49 pm

पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.