व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

December 23rd, 11:00 am

मी काल रात्री उशिरा कुवेतहून परत आलो आहे… तिथे मी भारतीय युवा आणि व्यावसायिकांची भेट घेतली आणि खूप गप्पा मारल्या. आता इथे आल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम देशातील युवा वर्गासोबत आयोजित केला आहे. हा अतिशय सुखद योगायोग आहे. आज देशातील हजारो युवांसाठी,आपणा सर्वांच्या आयुष्याची नवी सुरुवात होते आहे. तुमचे कित्येक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. 2024 हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नवीन आनंद देऊन जाते आहे. मी तुम्हा सर्व युवांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण

December 23rd, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.

सहकार क्षेत्रातील महत्वाच्या विविध उपक्रमांचा शिलान्यास तसेच उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 24th, 10:36 am

भारताच्या अमृत यात्रेमध्ये आज ‘भारत मंडपम्‘ विकसित आणखी एका मोठ्या कामगिरीचा साक्षीदार बनत आहे. ‘सहकार से समृद्धी’ म्हणजेच सहकारातून समृद्धीचा संकल्प देशाने केला आहे, तो साकार करण्याच्या दिशेने आज आपण आणखी पुढे जात आहोत. शेती आणि शेती व्यवसाय यांचा पाया भक्कम करण्यामध्ये सहकारी क्षेत्राच्या शक्तीची खूप मोठी भूमिका आहे. याचा विचार करून आम्ही स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. आणि आता याच विचारातून आजचा हा कार्यक्रम होत आहे. आज आम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशातील काना-कोप-यामध्ये हजारों कृषीमाल गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. आज 18 हजार ‘पॅक्स’ च्या संगणकीकरणाचे एक मोठे काम पूर्ण झाले आहे. या सर्व कामांमुळे देशामध्ये कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांचा आणखी विस्तार होणार आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाने जोडले जाणार आहे. तुम्हां सर्वांचे या महत्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणा-या या कार्यक्रमांसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तसेच अनेक -अनेक शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी

February 24th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 11 राज्यांमधल्या 11 प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये (पीएसीएस) उभारल्या जाणाऱ्या 'सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजने'च्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या उपक्रमांतर्गत गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी देशभरात अतिरिक्त 500 प्राथमिक कृषी पतसंस्थाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या गोदामांना अन्न पुरवठा साखळीमध्ये विनासायास समाविष्ट करणे, अन्न सुरक्षा मजबूत करणे तसेच नाबार्डद्वारे समर्थित आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) नेतृत्वाखालील सहकार्याने देशातील आर्थिक विकासाला चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी विपणन पायाभूत सुविधा (एएमआय) अशा सध्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या तसेच छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सहकार से समृद्धी या सरकारच्या संकल्पनेला अनुसरून, देशभरातील 18,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण करण्याच्या प्रकल्पाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले.

गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

February 22nd, 11:30 am

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, संसदेमधील माझे मित्र सी आर पाटील, अमूलचे अध्यक्ष श्यामल भाई, आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो! गुजरात मधील गावांनी मिळून 50 वर्षांपूर्वी जे रोप लावले होते ते आज विशाल वटवृक्ष बनले आहे आणि या विशाल वटवृक्षाच्या फांद्या आज देश परदेशात पसरल्या आहेत. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.गुजरात मधील दूध समितीशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक पुरुषाचे, प्रत्येक महिलेचे मी अभिनंदन करतो. याचबरोबर आपले एक आणखी मित्र आहेत जे दुग्ध व्यवसाय क्षेत्रातले सर्वात मोठे भागीदार आहेत. मी त्यांना सुद्धा नमस्कार करतो. हे भागीदार आहेत, आपले पशुधन. मी आज या प्रवासाला यशस्वी बनवण्यामध्ये पशुधनाच्या योगदानाला सुद्धा सन्मानित करत आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत आहे. त्यांच्या शिवाय दुग्ध व्यवसाय क्षेत्राची कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही आणि यासाठीच माझ्या देशातल्या पशुधनाला सुद्धा माझा प्रणाम आहे.

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधानांचा सहभाग

February 22nd, 10:44 am

गुजरातमध्ये अहमदाबाद मधील मोटेरा येथे नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आज आयोजित करण्यात आलेल्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ)सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला तसेच सुवर्णमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण देखील केले. जीसीएमएमएफ ही संस्था म्हणजे सहकारी संस्थांचा लवचिकपणा, या संस्थांची उद्योजकता विषयक उर्जा तसेच शेतकऱ्यांचा दृढ निश्चय यांचा पुरावाच आहे आणि त्याने अमूलला जगातील सशक्त दुग्धोत्पादन ब्रँड म्हणून स्थान मिळवून दिले आहे.

गुजरातच्या दियोदार इथल्या बनास दुग्धव्यवसाय केंद्रातील विविध विकास कामांचे उद्‌घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 19th, 11:02 am

आपण सगळे आनंदात आहात ना? आता जरा आपली क्षमा मागून मी थोडं भाषण हिंदीत करणार आहे. कारण या प्रसारमाध्यमातील मित्रांनी विनंती केली आहे की तुम्ही हिंदीत बोललात तर चांगला होईल, म्हणून मला वाटलं की सगळं तर नाही, पण थोडं त्याचं देखील ऐकायला हवं.

पंतप्रधानांनी बनासकांठामधील दीयोदर येथील बनास डेअरी संकुल येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले भूमीपूजन आणि देशाला समर्पण

April 19th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील दीयोदर इथे नवीन डेअरी संकुल आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांसाठी 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. नवीन डेअरी संकुल हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. हे सुमारे 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सक्षम असेल, सुमारे 80 टन लोणी, एक लाख लिटर आइस्क्रीम, 20 टन खवा आणि 6 टन चॉकलेट इथे दररोज तयार करता येतील. बटाटा प्रक्रिया केंद्र फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, आलू टिक्की, पॅटीज इत्यादी प्रक्रिया केलेल्या बटाटा उत्पादनांचे विविध प्रकार तयार करेल, यापैकी बरेच इतर देशांमध्ये निर्यात केले जातील. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करतील आणि या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतील. पंतप्रधानांनी बनास कम्युनिटी रेडिओ केंद्र ही राष्ट्राला समर्पित केले. हे कम्युनिटी रेडिओ केंद्र शेतकऱ्यांना कृषी आणि पशुपालनाशी संबंधित महत्त्वाची वैज्ञानिक माहिती देण्यासाठी स्थापन केले आहे. हे रेडिओ केंद्र सुमारे 1700 गावांतील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांशी जोडले जाईल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला देणार भेट

April 16th, 02:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.