पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 19th, 03:44 pm
गोवा मुक्ती दिनानिमित्त शुभेच्छा. गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीला बळ देणाऱ्या सर्व योद्ध्यांच्या शौर्याचे आपण स्मरण करूया. त्यांचा दृढनिश्चय आपल्याला गोव्याची समृद्धी आणि भरभराटीसाठी अथक कार्य करण्याची प्रेरणा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा
December 19th, 11:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.गोवा मुक्ती दिवसानिमित्त आयोजित समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
December 19th, 03:15 pm
भारत माता की जय, भारत माता की जय, समेस्त गोंयकार भावा-भयणींक, मायेमोगाचो येवकार! या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित गोव्याचे राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावलेकर जी, मनोहर आजगावकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळात माझे सहयोगी श्रीपाद नाईक जी, गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पटनेकर जी, गोवा सरकारचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि गोव्याच्या माझ्या बंधू भगिनींनो!गोवा इथं आयोजित गोवा मुक्ती दिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित
December 19th, 03:12 pm
गोवा इथे आयोजित गोवा मुक्ती दिनाच्या समारंभात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार केला. नूतनीकरण केलेले फोर्ट अग्वादा कारागृह संग्रहालय , गोवा वैद्यकीय महाविदयालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई उड्डाण कौशल्य विकास केंद्र आणि दाबोळी-नवेली, मडगाव येथील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्रांसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. गोवा येथील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या भारतीय आंतरराष्ट्रीय विधी शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाची पायाभरणीही त्यांनी केली.पंतप्रधान 19 डिसेंबर रोजी गोव्याला देणार भेट आणि गोवा मुक्ती दिन सोहळ्यात होणार सहभागी
December 17th, 04:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर रोजी गोव्याला भेट देतील आणि दुपारी 3 वाजता गोवा येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे गोवा मुक्ती दिनाच्या समारंभास उपस्थित राहतील. या कार्यक्रमात पंतप्रधान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मधील योद्ध्यांचा सत्कार करतील. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशासाठी दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.