PM Modi meets Prime Minister of Kuwait
December 22nd, 06:38 pm
PM Modi held talks with His Highness Sheikh Ahmad Al-Abdullah Al-Ahmad Al-Sabah, PM of the State of Kuwait. The two leaders discussed a roadmap to strengthen the strategic partnership in areas including political, trade, investment, energy, defence, security, health, education, technology, cultural, and people-to-people ties.PM Modi meets the Amir of Kuwait
December 22nd, 05:08 pm
Prime Minister Shri Narendra Modi met today with the Amir of Kuwait, His Highness Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah. This was the first meeting between the two leaders. On arrival at the Bayan Palace, he was given a ceremonial welcome and received by His Highness Ahmad Al-Abdullah Al-Ahmad Al-Sabah, Prime Minister of the State of Kuwait.नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला
December 18th, 06:51 pm
नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
November 20th, 08:05 pm
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.Joint Statement: 2nd India-Australia Annual Summit
November 19th, 11:22 pm
PM Modi and Anthony Albanese held the second India-Australia Annual Summit during the G20 Summit in Rio de Janeiro. They reviewed progress in areas like trade, climate, defence, education, and cultural ties, reaffirming their commitment to deepen cooperation. Both leaders highlighted the benefits of closer bilateral engagement and emphasized advancing the Comprehensive Economic Cooperation Agreement (CECA) to strengthen trade and investment ties.इटली-भारत संयुक्त सामरिक कृती योजना 2025-2029
November 19th, 09:25 am
भारत-इटली सामरिक भागीदारीचे अतुलनीय महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्राझीलमध्ये रिओ-दि-जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेतील 18 नोव्हेंबर 2024 च्या बैठकीदरम्यान, तिला अधिक गती देण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुढीलप्रमाणे लक्ष्यकेंद्री आणि कालबद्ध उपक्रम आणि सामरिक कृतीची संयुक्त योजना आखण्यात आली आहे. या दिशेने, इटली आणि भारत या देशांनी पुढील गोष्टींना मान्यता दिली आहे:पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
November 19th, 05:26 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची भेट घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन नेत्यांची झालेली भेट तसेच जून महिन्यात इटली येथे जी 7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीच्या वेळी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांची या वर्षभरातील ही तिसरी भेट आहे.Heartfelt gratitude to the government and the people of Nigeria for honoring me with Nigeria's national award: PM Modi
November 17th, 08:30 pm
In a ceremony at the State House, the President of the Federal Republic of Nigeria, H.E. Mr. Bola Ahmed Tinubu conferred the national award - Grand Commander of the Order of Niger” on Prime Minister Shri Narendra Modi for his statesmanship and stellar contribution to fostering India-Nigeria ties. The award citation notes that under Prime Minister’s visionary leadership, India has been positioned as a global powerhouse, and his transformative governance has fostered unity, peace and shared prosperity for all.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव
November 17th, 08:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर असून दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ नायजेरियाच्या स्टेट हाऊसमध्ये आयोजित समारंभात नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल तसेच भारत आणि नायजेरियातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील कारभारामुळे सर्वांसाठी एकता आणि शांतता प्रस्थापित केली आहे तसेच परस्पर सामायिक समृद्धी वाढली आहे, असे या पुरस्कारानिमित्त पंतप्रधानांना प्रदान केल्या केलेल्या मानपत्रात म्हटले आहे.पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाला भेट देणार
November 12th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. नायजेरियामध्ये ते धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासंबंधीच्या उच्चस्तरीय चर्चेत सहभागी होणार असून भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. ब्राझीलमध्ये ते G20 शिखर परिषदेत सहभागी होतील. गयानामध्ये, पंतप्रधान वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील तसेच तेथील संसदेलाही ते संबोधित करणार असून कॅरिबियन प्रदेशासोबतचे संबंध दृढ करण्याची भारताची बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या कॅरिकॉम-इंडिया समिटमध्ये सहभागी होतील.PM Modi congratulates H.E. Donald Trump, President-elect of the USA
November 06th, 11:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with the President-elect of the United States of America, H.E. Mr. Donald Trump.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
November 06th, 01:57 pm
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.भारत-अमेरिकेतील समावेशी जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.डिजिटल परिवर्तनाच्या प्रगतीबाबत आसियान-भारत संयुक्त निवेदन
October 10th, 05:42 pm
आसियान-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देण्याबाबत आमची वचनबद्धता अधोरेखित करत, 1992 मध्ये स्थापन झाल्यापासून आसियान-भारत संवाद संबंधांना चालना देत त्याची मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आसियान-भारत शिखर परिषद (2012) च्या दृष्टीकोन निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार आसियान-भारत संवाद संबंधांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आसियान-भारत स्मारक शिखर परिषदेची दिल्ली घोषणा (2018), शांततेसाठी इंडो-पॅसिफिकवरील आसियान दृष्टीकोन सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन, प्रदेशातील स्थैर्य आणि समृद्धी (2021), आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2022), सागरी सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन(2023) आणि संकटकालीन (2023) प्रतिसादात अन्न सुरक्षा आणि पोषण सशक्तीकरणावर आसियान-भारत संयुक्त नेत्यांचे निवेदनलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या व्हिएंटियानच्या भेटीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
October 10th, 07:00 am
21व्या आसियान-भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान श्री. सोनेक्से सिफानडोन यांच्या निमंत्रणावरून व्हिएन्टिन, लाओ पीडीआर येथे आज मी दोन दिवसांच्या भेटीवर जात आहे.Prime Minister Narendra Modi to visit Vientiane, Laos
October 09th, 09:00 am
At the invitation of H.E. Mr. Sonexay Siphandone, Prime Minister of the Lao People’s Democratic Republic, Prime Minister Shri Narendra Modi will visit Vientiane, Lao PDR, on 10-11 October 2024.During the visit, Prime Minister will attend the 21st ASEAN-India Summit and the 19th East Asia Summit being hosted by Lao PDR as the current Chair of ASEAN.अमेरिकेत डेलावेर मध्ये विल्मिंग्टन इथे झालेल्या क्वाड देशांच्या नेत्यांच्या सहाव्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
September 22nd, 05:21 am
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यजमान देश म्हणून ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल तसेच जागतिक कल्याणासाठी एक शक्ती म्हणून क्वाडला बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून आभार मानले. सद्यस्थितीत जग तणाव आणि संघर्षांने व्यापलेले आहे, अशावेळी सामायिक लोकशाही मूल्ये आणि तत्वांना अनुसरून क्वाड समूह देशांनी एकत्र येणे मानवतेसाठी महत्वाचे असल्याची बाबही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली. क्वाड संघटना ही कायमच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करत तसेच जागतिक पातळीवरील वादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरूनच नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाटचाल करत आली असल्याची बाबही त्यांनी आपल्या संबोधनात ठळकपणे अधोरेखित केली. स्वतंत्र, मुक्त, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हे क्वाड समूहाच्या सदस्य देशांचे परस्पर सामायिक उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी क्वाड ही संघटना कायम उपलब्ध असेल, परस्परांना सहकार्य करत राहील, तसेच भागीदारीच्या प्रयत्नांमध्येही सहभागी असेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.क्वाड राष्ट्रसमूह प्रमुखांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्घाटनपर भाषण
September 22nd, 02:30 am
माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभी, माझ्या मित्रांसोबत आजच्या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. क्वाड चा 20 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या स्वतःच्या विल्मिंग्टन शहरापेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही. Amtrak Joe (एम-ट्रेक जो) म्हणून, तुम्ही या शहराशी आणि डेलावेर शी जसे निगडित आहात, तसाच काहीसा संबंध तुमचा क्वाड सोबत देखील राहिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची त्यांच्या डेलावेर मधील विलमिंग्टन निवासस्थानी घेतली भेट
September 22nd, 02:02 am
अमेरिकेत सुरु असलेल्या क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची भेट घेतली. या भेटीला खास स्वरुप देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी विलमिंग्टन इथल्या आपल्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट
August 22nd, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची आज वॉर्सा येथे भेट घेतली. पोलंडच्या ‘फेडरल चॅन्सेलरी’ येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.