नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025‘ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 17th, 11:00 am
मागच्यावेळी ज्यावेळी मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो होतो, त्यावेळी लोकसभा निवडणुकांना काही फार अवधी राहिलेला नव्हता. त्यावेळी आपल्या सर्वांवर असलेल्या विश्वासामुळे मी म्हटले होते की, पुढच्यावेळीही भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मी जरूर उपस्थित राहीन. देशाने तिस-यांदा आम्हाला आशीर्वाद दिला आहे. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केले आहे, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन
January 17th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 या भारतातील सर्वात मोठ्या मोबिलिटी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सलग तिसऱ्यांदा आपल्या सरकारला निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, या वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती खूप वाढली असून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात इतर दोन ठिकाणी देखील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले गेल्या वर्षी 800 प्रदर्शक सहभागी झाले होते आणि 2.5 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली . मोदी यांनी नमूद केले की, पुढल्या 5 दिवसांमध्ये अनेक नवीन वाहने इथे प्रदर्शित केली जातील आणि अनेक प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यातून हे दिसून येते की भारतात मोबिलिटीच्या भविष्याशी संबंधित खूप सकारात्मकता आहे, असे ते म्हणाले. प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट दिल्याचा उल्लेख करताना, मोदी म्हणाले , भारताचा वाहन निर्मिती उद्योग विलक्षण आहे आणि भविष्यासाठी सज्ज आहे .यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचं उद्घाटन
December 11th, 04:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी, संध्याकाळी पाच वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेकृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे.