जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 17th, 11:10 am

तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी 2021 मध्ये जेव्हा आपण भेटलो होतो, तेव्हा कोविड महामारीच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले होते. कुणालाही माहीत नव्हते की कोरोना नंतरचे जग कसे असेल. मात्र आज एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेत संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. आपण सर्वजण जाणतो की जगातील बहुतांश व्यापार सागरी मार्गाने होतो. कोरोना पश्चात काळात आज जगालाही विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळीची गरज आहे. म्हणूनच यंदाची जागतिक भारतीय सागरी परिषद अतिशय महत्वपूर्ण आहे.

जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

October 17th, 10:44 am

तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज मुंबईत झाले. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या 'अमृत काल व्हिजन 2047' चे अनावरणही त्यांनी केले. या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी 'अमृत काल व्हिजन 2047' शी संबंधित 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले. देशाच्या सागरी क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही शिखर परिषद एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 ऑक्टोबर रोजी होणार "ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट 2023" चे उद्घाटन

October 16th, 12:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) 2023 च्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर 17 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत ही परिषद होणार आहे.